भाजपचं खरी ‘तुकडे तुकडे गँग’; हिंदुंना शिखांविरुद्ध भडकावण्यापासूनं बंद करा!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । कृषी कायद्याच्या विरोधातील शेतकरी आंदोलनाबद्दल बोलताना शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंह बादल यांनी भाजपला ‘तुकडे तुकडे गँग’ म्हणून संबोधलंय. आपल्या माजी सहकारी असलेल्या भाजपला त्यांनी ‘खरीखुरी तुकडे तुकडे गँग’ म्हटलंय. पंजाबमध्ये हिंदुंना शिखांविरुद्ध करण्याचा आरोप सुखबीर सिंह बादल यांनी केलाय.

‘देशात भाजप खरीखुरी तुकडे तुकडे गँग आहे. त्यांनी देशाच्या एकतेला तुकड्यांत विभाजन केलंय. ते निर्लज्जपणे हिंदुंना मुस्लिमांविरोधात भडकावत आहेत आणि आता नैराश्यग्रस्त अवस्थेत शांतिप्रिय पंजाबी हिंदुंना त्यांच्या शिख बंधुंच्या खासकरून शेतकऱ्यांच्या विरोधात उभं करू पाहत आहेत. ते देशभक्त पंजाबला जाती-धर्माच्या आगीकडे ढकलत आहेत’, असं ट्विट सुखबीर सिंह बादल यांनी केलंय.

भाजपनं कृषी कायद्यांवर ‘अहंकार वृत्ती’ सोडून शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं, असंही सुखबीर सिंह बादल यांनी म्हटलंय. हिंदुंना शिखांविरुद्ध भडकावण्यापासूनं बंद करा, असा इशाराही त्यांनी दिलाय. जर कोणी केंद्र सरकारच्या बाजूनं बोलत असेल तर त्याला ‘देशभक्त’ म्हटलं जातं, मात्र त्यांच्याविरूद्ध बोलल्यास त्याला ‘तुकडे तुकडे गँग’ म्हटलं जातं, असंही एनडीएसोबत केंद्रात काम केलेल्या शिरोमणी अकाली दलाच्या प्रमुखांनी म्हटलंय.

संसदेत विरोधकांचा विरोध डावलत केंद्रात सत्ताधाऱ्यांनी कृषी विधेयके संमत करून घेतले होते. यानंतर, अकाली दलाच्या नेत्या आणि सुखबीर सिंह बादल यांची पत्नी हरसिमरत कौर बादल यांनी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. सोबतच, राष्ट्रपतींनी या विधेयकांवर स्वाक्षरी करू नये, अशी विनंतीही त्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे केली होती. मात्र, राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर या विधेयकांचं कायद्यात रुपांतर झालं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment