पुण्याहून गोवा प्रवास अवघ्या 1 तासांत; सुरू होणार नवीन विमानसेवा

Pune To Goa Akasa Airline
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गोवा हे पर्यटनासाठी तर पुणे हे शिक्षणासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे पुण्यावरून गोव्याला जाणाऱ्यांची संख्या ही प्रचंड मोठी आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक सुपरफास्ट होईल अशी चर्चा होती. आता याच चर्चेला पूर्णविराम लागणार आहे. कारण या मार्गावर अकासा एअरलाइन्स या विमान कंपनीची विमानसेवा सुरु केली आहे. त्यामुळे गोव्यावरून पुण्याला विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.

गोवा ते पुणे अंतर पार होणार फक्त एका तासात

गोव्यावरून पुण्याला जाण्यासाठी विमानसेवा सुरु झाल्यामुळे गोवा ते पुणे हे अंतर पार करण्यासाठी प्रवाश्यांना केवळ 60 मिनिटे लागणार आहेत. यामुळे प्रवाश्यांचा वेळही वाचणार आहे आणि प्रवास हा आरामदायक देखील होणार आहे. पुण्यामध्ये नवीन टर्मिनलचे काम पूर्ण झाले आहे. मात्र त्याचे उदघाटन न झाल्यामुळे ही सेवा पुणेकरांसाठी ती खुली केलेली नाहीये. परंतु अकासा एअरलाइन्स कंपनीच्या सुरु झालेल्या विमानसेवेमुळे पुणेकरांसाठी ही मोठी
आनंदाची बातमी आहे.

कसे आहे हे वेळापत्रक?

सुरु झालेल्या या नवीन विमानसेवेचे वेळापत्रक कसे असेल हे आम्ही तुम्हाला सांगेन. गोव्यातून हे विमान दुपारी 3:45 वाजता निघेल तर 4:45 ला ते पुण्याला येऊन पोहचेल तर हे पुण्यावरून संध्याकाळी 5:35 वाजता विमान उड्डाणं करणार आहे. तर 6:35 वाजता हे विमान गोव्याला पोहचेल. या विमानसेवेमुळे पुण्यासोबतच गोव्याच्या पर्यटणास चालना मिळणार आहे.

पर्यटनाला मिळणार चालना

सुरु झालेल्या नवीन विमानसेवेमुळे पुणे आणि गोव्याच्या पर्यटनास चालना मिळणार आहे. गोव्यात असणारे बेट पाहण्यासाठी सातासमुद्रापार हुन पर्यटक येतात. तसेच पुण्यावरून गोव्याला जाण्यासाठी सध्या पर्यटकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे या नवीन सेवेमुळे पर्यटनास चालना मिळणार आहे. तसेच वेळेचीही बचत होणार आहे.