भाजपने योगींना आधीच घरी पाठवलं, त्यांनी आता तिकडेच राहावं

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भाजपने आपली पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. यामध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे आपले होम पीच असलेल्या गोरखपूर मतदारसंघातुन निवडणूक लढवतील हे निश्चित झाले आहे. भाजपच्या या निर्णयांनंतर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी योगिना टोला लगावला आहे

भाजपने योगींना आधीच घरी पाठवलं; त्यांनी आता तिकडेच राहावे. परत माघारी येऊ नये, असा टोलाअखिलेश यांनी लगावला. योगींनी उत्तर प्रदेश सोडा पण गोरखपूरमध्येही काहीच काम केलेले नाही. त्यामुळे गोरखपूरमधील सर्व जागाही समाजवादी पक्षच जिंकणार, असा विश्वास अखिलेश यांनी व्यक्त केला. राज्यातील ८० टक्के जनता समाजवादी पक्षासोबत आहे. त्यामुळे यावेळी सरकार बदलणार ही काळ्या दगडावरची रेष असल्याचेही अखिलेश म्हणाले.

दरम्यान, योगी आदित्यनाथ याना गोरखपूर मतदारसंघात उमेदवारी देऊन भाजपने सेफ गेम खेळला आहे. गोरखपूर मतदारसंघ हा मुख्यमंत्री योगींचा बालेकिल्ला आहे. त्यांनी गोरखपूर लोकसभा मतदारसंघातून सलग पाच वेळा विजय मिळवला आहे. पक्षाच्या नेतृत्वाने सगळ्यांशी विचारविनिमय करून योगींना गोरखपूरमधून उभे करण्याचा निर्णय घेतला आहे.

You might also like