अकोला जिल्हातल्या बार्शीटाकळी तालुक्यात ट्रॅक्टरचा अपघात, 4 जण जखमी

Accident
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अकोला : हॅलो महाराष्ट्र – अकोला जिल्हातल्या बार्शीटाकळी तालुक्यात मोठी दुर्घटना घडली आहे. यामध्ये ट्रॅक्टर ट्राॅलीसह पुलावरुन नदीत कोसळला आहे. या अपघातात (Accident) चार जण जखमी झाले आहेत. सविस्तर माहिती अशी कि, अकोला जिल्हातल्या बार्शीटाकळी तालुक्यातील पिंजर येथे विटाखाली करुन पिंजर येथुन पातुर नंदापुरकडे जात असतांना कारंजा ते पिंजर रोडवरील पिंजर जवळील स्मशानभूमीला लागुनच असलेल्या पिंजर्डा नदीच्या पुलावरून चार मुजरांसह ट्रॅक्टर ट्राॅलीसहीत नदीत कोसळला. हा अपघात (Accident) नेमका कशामुळे झाला हे मात्र अजून समजू शकलेले नाही. या अपघातानंतर (Accident) पुलावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.

पिंजर्डा नदीच्या पुलावरून ट्रॅक्टर ट्राॅलीसहीत नदीत पडले
नंदापुरकडे जात असतांना पिंजर्डा नदीच्या पुलावरून ट्रॅक्टर ट्राॅलीसहीत नदीत पडल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. यावेळी ट्रॅक्टरच्या ट्राॅलीमध्ये चार मजुर बसले होते. ट्रॅक्टर थेट नदीत पडल्याने चारही मजुर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. हे मजूर नेमके कुठले आहेत हे मात्र अजून समजू शकलेले नाही. या अपघाताचे (Accident) फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.

जखमी मजुरांवर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू
या अपघाताची (Accident) माहिती मिळताच आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. तसेच अपघात झाल्यावर आजुबाजूच्या लोकांनी मजुरांना बाहेर काढून त्यांना उपचारांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवले.

हे पण वाचा :
“साहेब मुंबईत बॅनरवर तुमचा फोटो ठेवणारा पहिला माणूस मी”; ‘या’ बंडखोर आमदाराचा व्हिडिओ व्हायरल

सत्ता गेली पण माज काही केल्या जात नाही…; गोपीचंद पडळकरांची घणाघाती टीका

फडणवीस मुख्यमंत्री न झाल्याने गिरीश महाजन अजुन रडतायत; अजितदादांची जोरदार फटकेबाजी

औरंगाबादच्या नामांतरावरून अबू आझमी आक्रमक; सभागृहातच ‘मविआ सरकार’ वर हल्लाबोल

अजितदादा तुम्हाला वाटलं मुख्यमंत्री व्हावं तर आमच्या कानात सांगा…; मुनगंटीवारांनीही साधला निशाणा