औरंगाबाद | शहरातील काही भागात जास्त संख्येने कोरोनाचे रुग्ण आढळले असून, तब्बल १९ वसाहती रेडझोन ठरल्या आहेत. या भागात चाचण्यांचे प्रमाण वाढवले जाणार असल्याचे मनपा आरोग्य अधिकारी डॉ. निता पाडळकर यांनी हॅलो महाराष्ट्र प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
शहरात कोरोना संपला आहे असे वाटत असतानाच गेल्या काही दिवसात अचानक रुग्ण वाढले आहेत . मागील काही दिवसात तर सातत्याने 300 पेक्षा अधिक रुग्ण आढळून येत आहे. यामुळे आता गुरुवारपासून शहरात अंशतः लॉक डाऊन लागू करण्यात आला आहे. संसर्ग अधिक असलेल्या भागांमध्ये चाचण्यांचे प्रमाण वाढवले जाणार आहे. अशी माहिती पाडळकर यांनी दिली. याकरिता दहा मोबाईल टीम तयार करण्यात आल्या आहेत. या टीमव्दारे संबंधित वसाहतींमध्ये रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांच्या चाचण्या केल्या जाणार आहेत. फेब्रुवारी महिन्यातील आकडेवारीनुसार शहरात १९ वसाहती रेडझोन ठरल्या आहेत. या ठिकाणी ५० पेक्षा अधिक रुग्ण आढळले आहेत.
रुग्णाच्या घरातील अंतरामुळे कंटेनमेंट झोन करण्यात अडचणी..
20 पेक्षा जास्त रुग्ण आढळल्यास संबंधित भाग कंटेनमेंट घेऊन जाहीर केला जाणार होता. पूर्वी संपूर्ण गल्ली बाधित आढळून येत होती. परंतु आता केवळ एकाच कुटुंबातील सदस्य पॉझिटिव्ह आढळून येत आहे. संबंधित 19 वसाहतींमध्ये पॉझिटिव्ह आढळून येणाऱ्या रुग्णांच्या घराचे अंतर अधिक आहे. यामुळे कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात अडचणी येत आहेत. असे देखील पाडळकर म्हणाल्या.
या वसाहती आहेत रेड झोन मध्ये….
वॉर्ड क्रमांक-१५ पडेगाव मिटमिटा (५७), वॉर्ड क्रमांक-५२ खडकेश्वर- धनमंडी, वॉर्ड क्रमांक-५१ नारळीबाग, निराला बाजार (६६), एन-९, एम-२ शिवनेरी कॉलनी, टीळकनगर, सावरकर नगर, पवन नगर (९२), वॉर्ड क्रमांक-३२ एन-७, आंबेडकर नगर, फुले नगर, वॉर्ड क्रमांक ३१- शिवनेरी कॉलनी, अशोक नगर, अयोध्या नगर (७७), वॉर्ड क्रमांक-३८ एन-१ (६१), वॉर्ड क्रमांक ७९- न्याय नगर, हुसेन कॉलनी, गारखेडा, स्वप्ननगरी (९३), वॉर्ड क्रमांक- ८० सिडको एन-४, वॉर्ड क्रमांक-९२ विश्रांतीनगर (१३७), वॉर्ड क्रमांक-८४ एन-२, एम-२ लघुवेतन कॉलनी, विश्रांती कॉलनी, एसटी कॉलनी कामगार चौक, आदर्श कॉलनी (९०), वॉर्ड क्रमांक-९८ उल्कानगरी, विश्वभारती कॉलनी (७६), वॉर्ड क्रमांक-६५ सेव्हन हिल कॉलनी, एमजीएम सुराणानगर, राज हाईट, महेश नगर, मंजीतनगर आकाशवाणी (७५), वॉर्ड क्रमांक -११२ शिवाजीनगर, रेणुका नगर, गादीया विहार, छत्रपती नगर (९८), वॉर्ड क्रमांक-९६ गुरू दत्तनगर, विजय नगर, गारखेडा परिसर, अरिहंत सहयोग नगर, सूतगिरणी (५२), वॉर्ड क्रमांक-१०६ कांचनवाडी, नक्षत्रवाडी, हिंदुस्थान आवास (६४), वॉर्ड क्रमांक- १०९ शहानुरमियॉं दर्गा, शहानुरवाडी (६०), वॉर्ड क्रमांक-११४ देवळाई नाईकनगर (१३१), वॉर्ड क्रमांक ११५ सातारा, एसआरपीएफ कॅम्प, पटेलनगर बीड बायपास, सुधारकरनगर (१५९), वॉर्ड क्रमांक-७० पदमपुरा, वॉर्ड क्रमांक-१०३ वेदांतनगर, आरटीओ कार्यालय परिसर (७६), वॉर्ड क्रमांक ७१ गुरुव्दारा परिसर उस्मानपुरा, मराठा गल्ली, रोहिणीनगर पीर बाजार, प्रतापनगर बालसदन (६३), वॉर्ड क्रमांक-७१ उस्मानपुरा, कबीरनगर, न्यू उस्मानपुरा, क्रांतीनगर कोकणवाडी, मिलिंदनग (६५) या सर्व वसाहतींचा रेड झोनमध्ये सामावेश आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.