जात प्रमाणपत्रासाठी 60 हजारांची लाच मागणारा ए.सी.बी.च्या जाळ्यात

औरंगाबाद | जात वैधता प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी तक्रारदाराकडून 60 हजारांची लाच मागून ती स्वीकारणाऱ्या जालना जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयातील शिपायाला एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले.भाऊसाहेब भालचंद्र सरोदे (वय ५०, रा.जालना),असे लाच स्वीकारणाऱ्या शिपायाचे नाव आहे.ही कारवाई औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली.

तक्रारदाराच्या नातेवाईकास जात वैधता प्रमाणपत्रासाठी भाऊसाहेब सरोदे याने 60 हजारांची मागणी केली होती. त्याची तक्रार औरंगाबाद येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. लाच प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक डॉ.राहुल खाडे,अपर अधीक्षक डॉ.अनिता जमादार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

पोलीस निरीक्षक संदीप राजपूत, पोलिस अंमलदार अरूण उगले, संतोष जोशी, केवलसिंग, चांगदेव बागुल आदींच्या पथकाने सापळा रचून 60 हजार रूपयांची लाच घेणाऱ्या भाऊसाहेब सरादे याला रंगेहाथ पकडले. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.