‘या’ राज्यात स्वस्त झाले मद्य, सरकारने ५०% वरून १५% कमी केला स्पेशल कोविड टॅक्स

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। कोरोना विषाणूच्या संक्रमणाच्या कारणामुळे मद्याचा खप करण्यासाठी सरकारांनी लिकरवर स्पेशल कोविड टॅक्स घ्यायला सुरुवात केली होती. आता ओडिसा सरकारने मद्यावरील कोविड स्पेशल टॅक्स कमी करून १५% केला आहे. आतापर्यंत ओडिसा सरकारने मद्यावर ५०% टॅक्स लावला होता.

मद्याच्या विक्रीवर कोविड स्पेशल टॅक्स च्या मदतीने ओडिसा सरकारने २०० करोड रुपयांची केली आहे. ओडिसाच्या एक्साईज विभागाने सांगितले की ‘इतर राज्यातील मद्याची किंमत पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. शेजारच्या राज्यांच्या तुलनेत ओडिसा मध्ये मद्याच्या किंमतीत अंतर कमी व्हावे म्हणून सरकार ने मद्याची एमआरपीबदलण्याचा निर्णय घेतला आहे.’

 

६ जुलै पासून ओडिसा सरकारने दुकानांमध्ये मद्यविक्रीला परवानगी दिली होती. १ जुलै पासून मद्याची होम डिलिव्हरी करण्यात येणार असल्याचे एका अध्यादेशात सांगण्यात आले होते. आणि पुढे तेच चालू राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. याच अध्यादेशात मद्याची दुकाने सकाळी सात ते संध्याकाळी सहा पर्यंत उघडली जाऊ शकतात असे सांगण्यात आले आहे. तसेच दुकानात मद्य पिता येईल असेही सांगण्यात आले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

 

Leave a Comment