कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
पैशाची गरज असल्याने टेंबलाई नाका येथील सैन्यदलाच्या जागेत झुडपात झोपलेल्या मद्यपी बंडी नागार्जुन (वय ३०, रा.वेलदूर, जिल्हा मेहबूबनगर, आंध्रप्रदेश) याच्या डोक्यात काठीचे फटके मारुन खून केल्याचे तपासात उघड झाले. या प्रकरणी संशयित अमीर दिलावर तहसिलदार (वय २६, रा. टेंबलाई नाका, रेल्वे फाटक) याला रात्री राजारामपुरी पोलिसांनी अटक केली.
आंध्र प्रदेशातील मूळ रहिवाशी असलेला बंडी नागार्जुन हा टेंबलाई नाका परिसरात राहणाऱ्या नातेवाईकांकडे दोन महिन्यांपासून राहत होता. त्याला दारूचे व्यसन असल्याने तो दिवसभर दारू पिऊन झाडाखाली अथवा निर्जन ठिकाणी झुडूपात झोपत होता. २५ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता बंडी टेंबलाई नाका परिसरातील सैन्यदलाच्या हद्दीतील जागेत झुडूपात झोपला होता. त्याच्या खिशात पैशाचे पाकीट होते. बंडीकडे नेहमी पैसे असतात, हे संशयित अमीर तहसिलदार याला माहिती होते. त्याला पैशाची गरज असल्याने झोपलेल्या बंडीला उठवून उभे करत काठीने त्याच्या डोक्यात फटके मारून त्याचा खून केल्याची त्याने कबुली दिली. अधिक तपास राजारामपुरी पोलीस करत आहेत.
ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.
हे पण वाचा-
जामिया विद्यापीठाजवळ अज्ञात माथेफिरू युवकाकडून मोर्चेकऱ्यांवर गोळीबार; विद्यार्थी जखमी
अखेर कोरोनाव्हायरसचा भारतात प्रवेश; वुहानहुन परतलेल्या विद्यार्थ्याला कोरोना विषाणूची लागण
नरेंद्र मोदी हे भगवान ‘राम’ तर अमित शाह भगवान ‘हनुमान’ आहेत- शिवराजसिंह चौहान