देशातील सर्वपक्षीय खासदार शरद पवारांच्या बारामतीत; चर्चाना उधाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काॅंग्रेसचे सर्वेसर्वा आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या भेटीला विविध पक्षांचे १२ खासदार शनिवारी बारामतीमध्ये दाखल झालेले आहे. त्यांच्यासोबत काही उद्योगपतींचाही समावेश आहे. बारामतीतील विकास कामांचा आढावा घेण्यासाठी हे सर्व खासदार आणि उद्योगपती आलेले आहेत. शनिवारी सकाळी बारामती विमानतळावर या पाहुण्याचे आगमन झालेले आहे.

बारामतीमधील विविध विकास कामं, , नियोजनबद्ध विकास आराखड्याची हे खासदार आणि उद्योजक पाहणी करणार आहेत. यामध्ये बारामतीतील औद्योगिक वसाहतीतील विविध कंपन्या, महिला सक्षमीकरण, शेतीविषयक विविध प्रचार व प्रसार तंत्रज्ञान, शैक्षणिक विकास, साखर उद्योगांची हे खासदार पाहणी करणार आहेत.

यामध्ये शिवकुमार उदासी, निशिकांत दुबे, दुष्यंत सिंग, सीएम रमेश या भाजप खासदारांचा समावेश आहे. तर सौगता रॉय (तृणमूल काँग्रेस), लवू कृष्णा देवरियालू (युवजन श्रमिक), रितेश पांडे (बसपा), विवेक गुप्ता (तृणमूल काँग्रेस) हे इतर चार खासदार आणि काही उद्योगतींचा समावेश आहे. दरम्यान हा अभ्यास दौरा असला तरी या दौऱ्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.