५ लाखांपर्यंतचा IT Refund तातडीने खात्यावर जाईल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । कोरोना विषाणूच्या संकटात सरकारने सामान्य करदाता आणि व्यावसायिकांना दिलासा देत मोठा निर्णय घेतला आहे. अर्थ मंत्रालयाने ५ लाखांपर्यंतचा कर परतावा तातडीने देण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयाचा फायदा 14 लाख करदात्यांना होईल. केंद्र सरकारने सर्व प्रलंबित जीएसटी आणि कस्टम परतावा देण्याचा निर्णयही घेतला आहे. याचा फायदा एमएसएमईसह सुमारे एक लाख व्यावसायिक संस्थांना होईल. अशा प्रकारे सुमारे 18 हजार कोटी रुपयांचा परतावा सरकारकडून देण्यात येणार आहे.

इनकम टॅक्स रिफंड- टॅक्स रिटर्न भरल्यानंतर ई-वेरिफिकेशन केले जाते. यानंतर टॅक्स रिफंड मिळण्यास सुमारे 2 ते 3 महिने लागतात. तथापि, बर्‍याच वेळा, हे फक्त १५ दिवसातच टॅक्स रिफंड जमा होतो. टॅक्स रिटर्नची ई-वेरिफिकेशननंतरच रिफंडची प्रक्रिया सुरू होते. इनकम टॅक्स रिफंडची स्थिती इनकम टॅक्स ई-फाइलिंग पोर्टल आणि एनएसडीएलच्या वेबसाइटवर जाऊन तुम्ही तपासू शकता. करदात्यांना आपला पॅन नंबर आणि मूल्यांकन वर्ष प्रविष्ट करावा लागेल. दरम्यान, प्राप्तिकर विभाग १ मार्च २०१९ पासून केवळ ई- रिफंड देईल. हा परतावा फक्त पॅन कार्डशी जोडलेल्या बँक खात्यात जमा होईल आणि आयकर ई-फाइलिंग करण्यापूर्वी www.incometaxefiling.gov.in वर पडताळणी केली गेली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”

Leave a Comment