दिलासादायक ! परदेशातून आलेले सर्व प्रवासी निगेटिव्ह, सांगलीत गेल्या काही दिवसामध्ये विदेशातून आले १५६ प्रवासी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर महापालिका क्षेत्रात परदेशातून आलेल्या सर्व प्रवाशांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, नव्याने परदेशातून आलेल्या अकरा जणांची कोरोना चाचणी केली असून त्याचा अहवाल दोन दिवसात प्राप्त होणार आहे. अनेक देशात ओमिक्रॉन व्हेरिएंटचा फैलाव झाला आहे. त्यामुळे देशात परदेशातून आलेल्या नागरिकांची कोरोना चाचणी केली जात आहे.

गेल्या काही दिवसामध्ये 156 प्रवासी विदेशातून आले होते. त्यापैकी 37 प्रवासी महापालिका क्षेत्रातील होते. या प्रवाशांची लिस्ट मिळाल्यानंतर तातडीने आयुक्त नितीन कापडणीस यांनी या प्रवाशांची शोध मोहिम सुरू करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गेल्या आठवड्यात प्रशासनाने युद्धपातळीवर शोधमोहीम केल्यामुळे ट्रेसिंग करता आले.

महापालिकेने 37 लोकांची कोरोना (आरटीपीसीआर) चाचणी करण्यात आली. होती. त्यापैकी 29 व्यक्तिंचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर नवीन यादीमधील 11 प्रवाशांचे रिपोर्ट अद्याप प्रलंबित आहेत. पहिल्या टप्प्यात आलेल्या 99 प्रवासी यादीमधील सर्व प्रवासी आणि नजीकच्या संपर्कातील व्यक्तींचे रिपोर्ट हे निगेटिव्ह आले आहेत अशी माहिती नोडल ऑफिसर डॉ. वैभव पाटील यांनी दिली. त्यामुळे महापालिका प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे.

Leave a Comment