हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| पुणे शहरातील वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस अधिक जाणवू लागली आहे. या कोंडीवर नियंत्रण मिळवण्याचे पूर्ण प्रयत्न वाहतूक विभागाकडून करण्यात येत आहेत. वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी यासंदर्भात विविध घोषणा केल्या आहेत. आता नितीन गडकरी यांच्या हस्ते पुणे शहरात भारत न्यू कार असेसमेंट प्रोग्राम म्हणजेच (भारत NCAP) चे उद्घाटन करण्यात आले आहे. या संस्थेमार्फत देशातील कारचे कमांड आणि कंट्रोल करण्यात येणार आहे. यामुळे ग्राहकांना कोणती कार जास्त फायदेशीर आहे याची माहिती मिळेल.
भारत एनसीएपीचे काम काय असेल?
भारत न्यू कार असेसमेंट प्रोग्राममार्फत सर्व नवीन वाहनांना स्टार रेटिंग देण्यात येईल. वाहनांमध्ये असलेली सुरक्षा आणि रचना तपासून एक ते पाचमध्ये रेटिंग दिले जाईल. यामुळे ग्राहकांना वाहने खरेदी करतावेळी कोणती वाहने सर्वाधिक फायदेशीर सुरक्षित आहेत याची माहिती मिळेल. रेटिंग तपासून ग्राहकांना एखादी कार खरेदी करणे देखील तितकेच सोपे होऊन जाईल. तसेच यामुळे कोणती गाडी जास्त सुरक्षित आहे हे देखील समजायला सोपे जाईल.
भारत एनसीएपी नक्की काय करेल?
भारत एनसीएपी ज्या कार्याला रेटिंग देईल त्या कारमध्ये, ऑक्यूपेंट प्रोटेक्शन (AOP), चाइल्ड ऑक्यूपेंट प्रोटेक्शन (COP) आणि सेफ्टी असिस्ट टेक्नोलॉजीज (SAT) या प्रकाराची पॅरामीटर्स तपासेल. तसेच त्यामध्ये, फ्रंटल इम्पॅक्ट, साइड इम्पॅक्ट आणि अपघातानंतर दरवाजे याचा देखील अभ्यास करेल. तसेच कारमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनिक तपासून त्यांचे रेटिंग ठरवले जाईल. कारची सुरक्षा कशी आहे तसेच कार किती वीज बचत करते हे पाहून देखील रेटिंग दिले जाईल.
रेटिंगची गरज काय?
सध्या कार खरेदी करणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे भारतात बनवण्यात येणाऱ्या गाड्यांची चाचणी भारतीय मानकांनुसार व्हावी असा हेतू Bharat NCAP च्या मागे आहे. यामुळे ग्राहकांना असाही फायदा होईल की, कोणतीही गाडी खरेदी करण्यापूर्वी त्यांना इतर माहिती सर्च करण्यापेक्षा थेट रेटिंग तपासून गाडी खरेदी करता येईल. या अधिकृत रेटिंगच्या आधारावर कंपनीचा दर्जा देखील लक्षात येईल.