प्रयागराज । अयोध्येमध्ये ५ ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या राम मंदिराच्या भूमिपूजनाचा मार्ग मोकळा झाला आहे. राम मंदिराच्या भूमिपूजनाविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका अलाहाबाद हायकोर्टाने रद्द केली आहे. पत्रकार साकेत गोखले यांनी ही याचिका दाखल केली होती.
अलाहाबाद हायकोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत साकेत गोखले यांनी भूमिपूजनाचा कार्यक्रम हा अनलॉक-२ च्या गाईडलाईनचं उल्लंघन असल्याचं म्हणलं होतं. साकेत गोखलेंनी दाखल केलेल्या जनहित याचिकेमध्ये भूमिपूजन कोविड-१९ च्या अनलॉक-२च्या गाईडलाईनचं उल्लंघन आहे. भूमिपूजनाच्या कार्यक्रमात तीनपेक्षा जास्त लोकं एकत्र येतील, त्यामुळे नियमांचं उल्लंघन होईल, असं नमूद केलं होतं.
राम जन्मभूमिचा कार्यक्रम झाल्यास कोरोनाच्या संक्रमणाचा धोका वाढेल. कोरोनाच्या काळात गर्दी होईल, म्हणून बकरी ईदला सामूहिक नमाज पठणाला परवानगी दिलेली नाही, मग भूमिपूजनला परवानगी कशी दिली जाऊ शकते? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”