आव्हाडांवरील विनयभंगाचा आरोप चुकीचा; अंजली दमानिया यांच्याकडून पाठराखण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. यानंतर आव्हाड यांनी मी ह्या पोलिसी आत्याचारा विरुद्ध लढणार असं म्हणत आमदारकीचा राजीनामा देण्याची तयारी दाखवली. या एकूण सर्व प्रकरणानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मात्र जितेंद्र आव्हाड यांची पाठराखण करत त्यांच्यावरील आरोप अतिशय चुकीचा आहे असं म्हंटल आहे.

विनयभंग? काय वाट्टेल ते आरोप? जितेंद्र आव्हाड यांच्या विरुद्ध मी खूप लढले आहे, पण त्यांच्यावरचा हा आरोप अतिशय चुकीचा आहे असं ट्विट अंजली दमानिया यांनी केलं आहे. आव्हाड यांचयकडून कुठेही विनयभंगासारखी कोणतीही कृती त्यांच्याकडून झालेली नाही असेही त्यांनी म्हंटल.

दुसरीकडे जितेंद्र आव्हाड यांच्या बाजूने त्यांच्या पत्नी ऋता आव्हाड मैदानात उतरल्या आहेत. मुख्यमंत्र्यांच्या कालच्या कार्यक्रमात खूप गर्दी होती. सुरक्षा रक्षकांचा मोठा बंदोबस्त होता. अशा ठिकाणी कुणी कुणाला बाजूला केलं तरी कुणाच्या लक्षात येत नाही. त्यामुळे या महिलेलाही गर्दीमुळे खांद्याला धरून बाजूला केलं असेल. पण चार तासानंतर आपल्याला बाजूला केलं याची या महिलेला जाणीव कशी झाली? हा काय पोरकटपणा आहे, असा संतप्त सवाल ऋता आव्हाड यांनी केला.

नेमकं काय आहे प्रकरण –

रविवारी कळवा आणि ठाणे शहराला जोडणाऱ्या तिसऱ्या कळवा खाडी पुलाचे उद्धाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे आणि आमदार जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. या उद्धाटन कार्यक्रमावेळी आव्हाड यांनी धक्का दिल्याचा आरोप या महिलेने केला आहे. आव्हाड यांनी चुकीच्या पद्धतीने शरीलाला स्पर्ष करत बाजूला होण्यास सांगितले असा दावा करत या महिलेने स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांना संपर्क साधत तक्रार दाखल केली, याप्रकरणी मुंब्रा पोलीस पुढील तपास करत आहेत.