राठोड, मुंडे यांच्यानंतर आता राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप; पत्रकार परिषदेत महिलेचे धक्कादायक माहिती

0
92
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे, शिवसेना नेते संजय राठोड यांच्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आणखी एका नेत्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप झाले आहेत. पीडित महिलेने पुणे येथे पत्रकार परिषद घेऊन याबाबत धक्कादायक माहिती दिली आहे. यावेळी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यायादेखील उपस्थित होत्या.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/500608194442090

राष्ट्रवादीचे परभणी लोकसभेचे उमेदवार राजेश विटेकर यांच्यावर महिलेने लैंगिक अत्याचाराचे आरोप केले आहेत. या नेत्याकडून लग्नाच्या, नोकरीच्या अमिषाने असा प्रकार केला असून याप्रकरणी त्याच्यवर बलात्काराचा गुन्हा दाखल करुन त्याला तत्काळ अटक करा, अशी मागणी पुणे येथे भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी केली आहे.

भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी पीडितेसह केलेल्या खळबळजनक आरोपामुळे राष्ट्रवादीच्या अडचणी अजून वाढणार आहेत. याबाबत पीडितेने दिलेली माहिती अशी कि, “राजेश विटेकर यांनी माझे अश्लील व्हिडीओ केले आहेत. वर्षभरापासून माझ्यावर अत्याचार करण्यात आला. अद्याप गुन्हा दाखल करत नाहीत. माझ्याकडे पुरावे आहेत, फक्त तपास सुरू असल्याचे सांगतात. शरद पवार यांच्यामुळे गुन्हा दाखल होणार नाही, असं राजेश विटेकर म्हणत आहेत.

देसाई यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमुळे राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. यापूर्वी सामाजिक कल्याण मंत्री धनंजय मुंडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यासारख्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांवर लैंगिक अत्याचाराचे आरोप झाले होते. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी आपल्या आयुष्यातील महिलेविषयी जाहीर वाच्यता केली. तर त्यांच्याविरोधात आरोप करणाऱ्या महिलेने ही तक्रार नंतर मागे घेतली. दुसरीकडे, शिवसेनेचे नेते आणि माजी वनमंत्री संजय राठोड यांच्यावरही गंभीर आरोप झाले होते. एका तरुणीच्या आत्महत्येनंतर राठोड संशयाच्या भोवऱ्यात अडकले होते. त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीसाठी त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा स्वीकारण्याचा निर्णय घेतला. मात्र दोघा मंत्र्यांवरील आरोपांमुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आलं होतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here