अल्युमिनियम आणि भंगार चोरणारी टोळी औरंगाबादमध्ये जेरबंद

0
34
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद प्रतिनिधी । अल्युमिनियमसह भंगाराची चोरी करणाऱ्या एका मोठ्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले आहे. संदीप गिरी (वय 22) यांनी 16 फेब्रुवारी रोजी चिकलठाणा पोलीस ठाण्यात एक टन अल्युमिनियम व मोबाईल चोरी गेल्याची फिर्याद दाखल केली होती.

या प्रकरणी, स्थानिक गुन्हे शाखेने आपली तपासाची चक्रे फिरवले असता त्यांना भंगार चोरणाऱ्या टोळीचा सुगावा लागला. पोलिसांनी विविध ठिकाणाहून चोरी करणाऱ्या आरोपींना ताब्यात घेतले आहे.  शहेनशहा शब्बीर (अकोला), मोबिन खान (बुलढाणा), मोहसीनखान अत्तार, महेबूब शहा, भीमराव वानखळे, असिफ शेख, जावेद शेख (औरंगाबाद), युनूस शेख (सोयगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

दरम्यान पोलिसांनी अधिक विचारपूस केली असता आरोपींनी इतर ठिकाणी ही चोरी केल्याचे स्पष्ट झाले आहे. आरोपींकडून 32 क्विंटल अल्युमिनियम व भंगार, गुन्ह्यात वापरलेले बोलेरो पिकअप, एक दुचाकी, मोबाईल तसेच सावंगी शिवारातून चोरलेले लहान मोठे टायर असा एकूण 10,62,300 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here