मुंबई । अमरावतीच्या खासदार नवनीत राणा गेल्या २२ दिवसापासून कोरोनाशी लढत आहेत. मुंबई येथील निवासस्थानी त्यांनी आज गणपती बसवत विधीवत पूजा केली. आमदार रवी राणा यांनी देखील गणपतीची आरती करत लवकरात लवकर कोरोनाचे संकट दूर होवो अशी अपेक्षा आणि प्रार्थना गणरायाकडे केली. नवनीत राणा यांनी घरी गणपतीसाठी आपल्या हाताने मोदक करत संवाद साधला.
https://youtu.be/ryc-T4kLUDs
नवनीत राणा या कोरोना पॉझिटिव्ह असल्याने त्यांना मुंबईत लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यामुळे त्या आपले पती आमदार रवी राणा यांच्यासह मुंबई येथील निवासस्थानी होमक्वांरटांइन आहेत.
https://youtu.be/MP3k8hzCM90
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”