आश्चर्यकारक! बुटाला मिळाली ४.६० कोटी रुपये किंमत

0
39
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेक वेळा आपण बाजरात वेगवगेळ्या प्रकारचे बूट पाहतो. परंतु त्याची किंमत जास्तीत जास्त किती असेल साधारण आपल्या हिशोबाने पहिले तर याची किंमत हि ४ हजारापासून ते दहा हजारापर्यंत असेल. परंतु कोटींमध्ये असलेली बुटाची किंमत ऐकली नसेल. ३५ वर्षांपूर्वी चा असलेला बूट हा चक्क ४. ६० रुपये या किमतीला विकला आहे.

हे जे ३५ वर्षपूर्वीचे बूट आहेत ते अमेरिकेतील ड्रीम टीमचा भाग असलेल्या बास्केटबॉल खेळाडूं मायकल जॉर्डनच्या आहे. हे बूट स्नीकर्स आहेत ते साधारण ६ लाख १५ हजार च्या डॉलर्स च्या लिलावात विकण्यात आले आहेत. कंपनीच्या माहितीनुसार यापूर्वी हि सुद्धा अनेक खेळाडू याचे शूज लिलावात विकले आहेत. परंतु आत्तापर्यन्त च्या शूज लिलावात याला जास्त किंमत मिळाली आहे. आणि आत्तापर्यन्त चे रेकार्ड या शूज ने मोडले आहेत.

हे शूज हे एअर जॉर्डन १ टीमचे आहेत . कि जे एनबीए या स्टार ने १८८५ मध्ये एका मॅच च्या दरम्यान घातले होते. हि मॅच इटली मध्ये झाली होती. साधारण त्या वेळी जॉर्डन ने इतक्या मोठ्या प्रमाणात बॉल ला किक मारली होती कि, तो बॉल बॅकबोर्ड च्या काचेवर पडून काच फुटली होती. १४ वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जेवढे बूट वापरले होते. त्या सगळ्या बुटांचा लिलाव झाला आहे. असे संस्थने सांगितले. या बुटांचा लिलाव हा क्रिस्टी संस्थेच्या मार्फत झाला होता. जॉर्डेन च्या ब्रँड ने घोषित केले आहे कि, समानता आणि सामाजिक न्याय या साठी काम करणाऱ्या संस्थेला त्यातील काही रक्क्म दान करण्यात येणार आहे. निवृत्ती नंतर सुद्धा त्याच्या एकाही वस्तूंचे मूल्य कमी झाले नव्हते. त्याच्या वस्तूंसाठी अनेक वेळा स्पर्धा लागल्या होत्या.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here