हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Amazon Prime Day Sale 2022 : सध्या तरुणाईमध्ये महागड्या मोबाईल फोनची वेगळीच क्रेझ आहे. फोन महाग असला तरी बाकीच्या मोबाईल तुलनेत तो सर्वोत्तम मानला जातो. कोणतीही ऑफर आली तर चाहते खरेदी करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. अशांसाठी आता Amazon वर लवकरच Prime Days सेल सुरू होणार असून Amazon ने या सेलच्या तारखांची नुकतीच घोषणा केली आहे. येत्या 23 व 24 रोजी मोठा सेल भरणार आहे. याला 23 जुलै रोजी रात्री 12 वाजल्यापासून सुरु झालेल्या या सेलची ऑफर 24 जुलै 11:59 पर्यंत राहणार आहे.
या सेलमध्ये केवळ स्मार्टफोनच नाही तर इतर वस्तूंवर देखील आकर्षक ऑफर्सचा फायदा मिळेल. 48 तासांच्या या सेलमध्ये ऍमेझॉनला स्मार्टफोनपासून कन्ज्युमर इलेक्ट्रॉनिक्स, टीव्ही, उपकरणे, फॅशन आणि ब्युटी, किराणा, ऍमेझॉन डिव्हाइसेस, घर आणि स्वयंपाकघरातील फर्निचर या सर्व गोष्टींवर प्रचंड सूट देण्यात येणार आहे. (Amazon Prime Day Sale 2022) वर तब्बल 55 टक्यांपर्यंत डिस्काउंट दिला जाणार आहे.
Samsung, Xiaomi, Intel, Bot, आदींसारख्या 400 हून अधिक टॉप भारतीय आणि जागतिक ब्रँड्स Amazon सेलमध्ये 30 हजाराहून अधिक नवीन प्रोडक्ट्स लाँच करतील. याशिवाय, XECH, Cos-IQ, हिमालयन ओरिजिन, Handicrafts सारखे 120 हून अधिक लहान आणि मध्यम व्यवसाय इलेक्ट्रॉनिक्स, फॅशन आणि ग्रूमिंग, ज्वेलरी, हँडमेड प्रोडक्ट्स आणि बरेच काही 2 हजार नवीन प्रोडक्ट्स लाँच करतील. (Amazon Prime Day Sale 2022)
दोन दिवस चालणाऱ्या या सेलमध्ये ICICI Bank आणि SBI कार्ड्सने पेमेंट केल्यास 10 टक्के अतिरिक्त डिस्काउंट दिला जाणारा आहे. सेलमध्ये मोबाइल आणि एक्सेसरीजवर 40 टक्क्यांपर्यंत डिस्काउंटचा फायदा होणार आहे. एवढेच नाही तर प्रोडक्ट्सला नो-कॉस्ट EMI आणि Exchange ऑफरसह खरेदी करता औ शकणार आहे. लॅपटॉप, हेडफोन आणि इतर प्रोडक्ट्सला ७५ टक्क्यांच्या डिस्काउंटसह खरेदी करू शकता. काही नवीन प्रोडक्ट्स देखील यावर्षी लाँच केले जाणार आहेत. विशेष म्हणजे iPhone 13 वर देखील आणखी सूट मिळाली आहे. (Amazon Prime Day Sale 2022)
महागडे मोबाईलही स्वस्त
Amazon सेलमध्ये प्रसिद्ध अशा कंपन्यांच्या आकर्षक मोबाईलवरही खास ऑफर असणार आहेत. त्यामध्ये OPPO A15s: OPPO A15s मध्ये 4GB एक्सपेंडेबल RAM आणि 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 14,490 रुपये आहे. मात्र, (Amazon Prime Day Sale 2022) सेलमध्ये 27 टक्के डिस्काउंटनंतर फक्त 10 हजार 990 रुपये किमतीत मिळणार आहे. तर एक्सचेंज ऑफरमध्ये 8900 रुपयांचीही अजून भजत करता येणार आहे. Kotak Bank च्या क्रेडिट कार्ड अथवा डेबिट कार्ड द्वारे पैसे देण्यावर 7.5 टक्के साधारण 1500 रुपये पर्यंत डिस्काउंट मिळू शकणार आहे.
हे पण वाचा –
Jio च्या 22 रुपयांच्या या प्लॅनमध्ये मिळणार महिनाभर इंटरनेट !!!
Bank of Baroda ने चेक पेमेंटच्या नियमांमध्ये केले महत्वाचे बदल, चेक देण्यापूर्वी जाणून घ्या
ICICI Bank कडून कर्ज घेणे महागले, बँकेने MCLR मध्ये केली 20 बेसिस पॉईंटची वाढ
Credit Card द्वारे खरेदी करताना कोणत्या गोष्टींचे बिल EMI मध्ये कन्व्हर्ट करता येत नाही तेजाणून घ्या
Whatsapp ने आणले नवे फीचर्स; 2 दिवसांपूर्वीचा मेसेजही डिलीट करता येणार