हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसेच्या दीपोत्सव सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली होती. शिवाजी पार्क वर हे तिन्ही नेते एकत्र आल्यानं राज्याच्या राजकारणात नवे समीकरण दिसणार का याचीही चर्चा सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे याना विचारला असता त्यांनी तिन्ही नेत्यांना जोरदार टोला लगावला आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना दानवे म्हणाले, मुळामध्ये या तिघांना मी मोठं का म्हणू? एकाने शिवसेनेचे ४० आमदार घेऊन गद्दारी केली, एकाचा एकही आमदार महाराष्ट्रात नाही, आणि तिसरे म्हणजे मुख्यमंत्री पदावरून उपमुख्यमंत्री पदावर आले आहेत असं म्हणत अंबादास दानवे यांनी एकनाथ शिंदे, राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
महाराष्ट्रातही 75 हजार तरुणांना नोकऱ्या देणार; फडणवीसांची घोषणा
वाचा सविस्तर-👉🏽 https://t.co/PXnd3fYNr8#hellomaharashtra @Dev_Fadnavis
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 22, 2022
मुंबई महापालिकेची सत्ता मिळवण्यासाठी आणि उद्धव ठाकरे यांच्या दहशतीमुळे हे तिघेही एकत्र आले आहेत. समोरच्याची भीती वाटते तेव्हाच सगळे एकत्र होत असतात त्यामुळे उद्धव ठाकरेंची आणि त्यांच्या शिवसेनेच्या भीतीपोटीच सर्व एकत्र येत आहेत असं अंबादास दानवे यांनी म्हंटल.