सुपरस्टार पतीवर आरोप करणे या अभिनेत्रीला पडले भारी;चुकवावी लागली मोठी किंमत

0
49
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। हॉलिवूड सुपरस्टार जॉनी डेप आणि अभिनेत्री अ‍ॅम्बर हर्ड यांचा घटस्फोट झाला आहे. मात्र तरीही दोघे सतत आपल्या नात्याबद्दल चर्चेत असतात.आता या अभिनेत्रीला हॉलिवूड सुपरस्टारशी पंगा घेणं चांगलंच महागात पडलं आहे. डीसी युनिव्हर्सच्या ‘अ‍ॅक्वामॅन २’ या बिग बजेट चित्रपटातून तिची हकालपट्टी करण्यात झाली आहे.या अ‍ॅम्बरला चित्रपटातून बाहेर काढावं यासाठी जॉनीचे चाहते प्रचंड आक्रमक झाले होते. त्यांनी लाखोंच्या संख्येने निर्मात्यांना इमेल आणि पत्रे पाठवली होती. त्यामुळे प्रेक्षकांच्या आग्रहास्तव अखेर ‘अ‍ॅक्वामॅन’मधील तिचा रोल एडिट करुन केवळ तीन सीनच ठेवले आहे.

अ‍ॅम्बर हर्ड हि जॉनी डेपची घटस्फोटीत पत्नी आहे. तिने या अभिनेत्यावर कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप केले होते.या दरम्यानच दोघांच्या खासगी संभाषणाची एक ऑडिओ क्लिप लीक झाली. या ऑडिओ क्लिपमुळे अ‍ॅम्बरचे आरोप कोर्टात खोटे सिद्ध झाले.या आरोपांमुळे जॉनीचे चाहते अ‍ॅम्बरवर संतापले होते. परिणामी चाहत्यांनी अ‍ॅम्बरला चित्रपटातून बाहेर काढण्याची त्यांनी विनंती केली होती. मात्र तिला या चित्रपटातून पूर्णपणे बाहेर काढण शक्य नव्हतं. असं केल्यास निर्मात्यांना कोट्यवधींचे नुकसान सोसावे लागले असते. त्यामुळे तिचा रोल निर्मात्यांनी कमी केला आहे.

‘अ‍ॅक्वामॅन २’ हा एक सुपरहिरो चित्रपट आहे. या चित्रपटात अ‍ॅम्बर हर्ड ‘मीरा’नावाची भूमिका साकारत आहे.चित्रपटात मीरा ही अ‍ॅक्वामॅनची प्रेयसी दाखवली आहे.अ‍ॅक्वामॅनप्रमाणेच तिच्याकडे देखील काही खास शक्ती आहेत. या चित्रपटाचा पहिला भाग हा सुपरहिट ठरला होता. त्यामुळे प्रेक्षकांच्या आग्रहास्तव चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची निर्मिती केली जात आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here