हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कोल्हापुरात मराठा समाजाच्या आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेऋत्वखाली आज सर्वपक्षीय नेत्यांकडून मूक मोर्चा आंदोलन करण्यात आले. बुधवारी केलेल्या आंदोलनास मोठ्या संख्येने विविध संघटनानीही सहभाग घेतला. या ठिकाणी कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, शिवसेना खासदार संजय मंडलिक भेट देत आपली मते व्यक्त केली. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील यांनी खासदार छत्रपती संभाजीराजे यांना मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वेळ दिली असून उद्याच चर्चेसाठी यावं, असे सांगत भेटीचे निमंत्रण दिले.
कोल्हापुरात बुधवारी करण्यात आलेल्या आंदोलनास विविध राजकीय पक्षातील नेंनेत्यांनी भेटी देत आपली भूमिका मांडली. यावेळी शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने हे आजारी असताना देखील सलाईन लावून आंदोलनात सहभागी झाले. खासदार माने यांनी ४८ खासदारांना एकत्रित येण्याचे आवाहनही केले. आणि मराठा आरक्षणासाठी सरकारने लोकसभेचे अधिवेशन घ्यावे, अशी मागणीही केली. त्यांच्यानंतर पालकमंत्री सतेज पाटील यांनी आपले मत व्यक्त केले.
यावेळी पाटील म्हणाले, ” खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज मराठा आरक्षणप्रश्नी मूक आंदोलन केले आहे. त्यांच्या आंदोलनास आमचाही पाठिंबा आहे. सध्या राज्य सरकारने जी भूमिका मंडळी आहे ती स्पष्ट करणे हे आमचे कर्तव्य आहे. केंद्र आणि राज्याच्या समनवयाची जबाबदारी संभाजीराजेंची आहे. त्यांनी मांडलेल्या मागण्यांवर राज्य शासन सकारात्मक आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यासोबत चर्चा करणार आहेत. ते मुंबईला भेटतील. त्यामुळे उद्याच तुम्ही मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना भेटायला उद्याच यावं. राज्य सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी आमंत्रण देतो. राज्य सरकार कुठेही कमी पडणार नाही, असे आश्वासन यावेळी सतेज पाटील यांनी दिले.