हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पुण्यातील आंबिलओढा येथील अनधिकृत बांधकामावर महापालिकेने कारवाई केल्यानंतर नागरिकांनी पुणे महापालिकेसमोर ठिय्या मांडला. यावेळी आंदोलकांच्या भेटीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे गेल्या असता वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या समोरच “अजित पवार मुर्दाबाद, महाविकास आघाडी सरकार मुर्दाबाद,” अशा घोषणा दिल्या.
अजित पवारांनी ही कारवाई करण्यास असून बिल्डर देखील अजित पवार यांच्या जवळचा आहे असं सांगत वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि आंदोलकांनी न्याय देण्याची मागणी केली. याशिवाय दलितांची मते चालतात मात्र आमचे प्रश्न का सोडवता येत नाही असा सवालही उपस्थित केला.
यावेळी सुप्रिया सुळे यांनी याप्रकरणात कोणतंही राजकारण करु नये असं आवाहन केलं. त्या म्हणाल्या, मी इथे राजकारण करण्यासाठी आले नाही. हा विषय संवेदनशीलपणे सोडवणे आवश्यक आहे. त्यामुळे कोणीही राजकारण न करता हा प्रश्न मार्गी लावावा असे आवाहन सुप्रिया सुळे यांनी केले.