कराडच्या विमानतळावर सुरु झाली फ्लाईंग अकॅडमी; आता घेता येणार गगनभरारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बहुचर्चित असलेल्या कराड येथील विमानतळावर वैमानिकाचे प्रशिक्षण देणारी फ्लाईंग अकॅडमी कधी सुरू होणार? अशी चर्चा अनेकवेळा केली जात होती. मात्र, आता या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. कारण अँबिशिएन्स फ्लाईंग क्लबच्यावतीने कराड येथील विमानतळावर आजपासून विद्यार्थ्यांना प्रत्यक्षरीतीने वैमानिक प्रशिक्षण देण्यास सुरुवात करण्यात आली. यावेळी अँबिशिएन्स फ्लाईंग क्लबचे डायरेक्टर परवेझ दमानिया, अश्विन अडसूळ, फ्लाईंग क्लब बेसचे इन्चार्ज पंकज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

गेल्या अनेक दिवसांपासून अँबिशिएन्स फ्लाईंग क्लबच्यावतीने कराड येथील विमानतळावर वैमानिक प्रशिक्षण देण्यासाठी फ्लाईंग अकॅडमी उभारणीचे काम सुरु होते. साधारणतः सात महिन्यापूर्वी प्रशिक्षणासाठीची तीन विमाने या ठिकाणी आणण्यात आली होती. त्यांच्याकडून सात महिन्यात अनेक प्रकारच्या चाचण्या देखील घेण्यात आल्या.

प्रशिक्षणासाठी एकूण पाच विमाने या अकॅडमीत असणार आहेत. यातील सेन्सा 172 ही दोन विमाने तर सेन्सा 152 हे एक विमान येथील विमानतळावर दाखल झाले आहे. यातील दोन विमाने दोन सीटची तर एक विमान चार सीटचे आहे. ही विमाने ठेवण्यासाठी व मेन्टेनन्ससाठी विमानतळावर बाजूला एअरक्राफ्ट हँगरची निर्मिती करण्यात आली आहे. या ठिकाणी टेक्निकल स्टाफ काम पाहत आहे.

एका वर्षात स्थानिकांसह देशभरातील सुमारे 50 विद्यार्थी येथे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यांचा कालावधी दोन वर्षे इतका आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर खासगी विमान कंपन्यांमध्ये या विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. आता प्रत्यक्षपणे प्रशिक्षणास आजपासून सुरुवात करण्यात आली असल्यामुळे याचा नक्कीच फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे.

हि तर कराडकर नागरिकांसाठी आनंदाची गोष्ट : परवेज दमानिया

कराड विमानतळाच्या ठिकाणी अद्यावत अशी वैमानिक प्रशिक्षण देणारे अकॅडमी व्हावी यासाठी माजी मुख्यमंत्री तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी आम्हाला मोलाचे सहकार्य कलेले. कराड येथे ते आल्यानंतर त्यांच्या उपस्थिती देखील एक कार्यक्रम घेणार आहे. या ठिकाणी अँबिशिएन्स फ्लाईंग क्लबच्यावतीने सुरु करण्यात आलेल्या वैमानिक प्रशिक्षण अकॅडमीत सहभागी होत परिसरातील अनेक विद्यार्थ्यांना देखील प्रशिक्षण घेता येणार आहे. हि नक्कीच कराड येथील नागरिकांसाठी आनंदाची गोष्ट म्हणावी लागेल असे अँबिशिएन्स फ्लाईंग क्लबचे डायरेक्टर परवेज दमानिया यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’शी बोलताना सांगितले.

घ्यावे लागणार 200 तासांचे प्रशिक्षण

सध्या या ठिकाणी चार सीटरची दोन विमाने आणि दोन सिटरची दोन विमाने प्रशिक्षणासाठी उपलब्ध आहेत. सहा सीटरचे विमान लवकरच कराड येथील विमानतळावर दाखल होणार आहेत. या ठिकाणी आजपासून सध्या वीस विद्यार्थ्यांच्या बॅचचे प्रशिक्षण सुरु झाले असून प्रशिक्षित व्यावसायिक पायलट बनण्यासाठी 200 तासांचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना घ्यावे लागणार आहे. हा फ्लाईंग क्लब पश्चिम महाराष्ट्रातील दुसरा क्लब आहे.

फेब्रुवारी 2019 मध्ये केली होती घोषणा

पुणे, जळगाव, लातूर, नागपूर बारामती, धुळेनंतर आता कराड सारख्या ठिकाणी विमान चालविण्याचे प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे याचा वैमानिक होण्यासाठी कराड भागातील युवक-युवतींना देखील लाभ होणार आहे. दमानिया एअरवेजने महाराष्ट्र शासनाशी करार करून फ्लाईंग अकॅडमी सुरू करण्याच्या दिशेने पावले टाकली. फेब्रुवारी 2019 मध्ये परवेज दमानिया यांनी कराड विमानतळाची पाहणी करून फ्लाईंग अकॅडमीची घोषणा केली होती. त्यानंतर सुविधा उपलब्ध केल्या. या माध्यमातून रोजगार निर्मितीसह स्थानिक पातळीवर आर्थिक विकासाला देखील मोठी चालना मिळण्यास मदत होणार हे नक्की.