WhatsAppच्या माध्यमातून JioMart चा शुभारंभ! लॉकडाउनध्ये ‘असा’ घेता येईल लाभ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । रिलायन्सने आपले ऑनलाइन ई-कॉमर्स पोर्टल JioMart ची सुरूवात केली आहे. फेसबुकची मालकी असलेल्या इंस्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp द्वारे या सेवेचा शुभारंभ रिलायन्सने केला आहे. काही दिवसांपूर्वीच जगातील आघाडीची सोशल मीडिया कंपनी फेसबुकने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या रिलायन्स जिओ प्लॅटफॉर्ममध्ये मोठी गुंतवणूक करणार असल्याची घोषणा केली. या अंतर्गत फेसबुकने जिओमध्ये 43 हजार 574 कोटी रुपयांची गुंतवणूक करत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर लॉकडाउनदरम्यान जिओमार्टची सेवा सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी रिलायन्स फेसबुकची मालकी असलेल्या इंस्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp ची मदत घेत आहे. आपल्या इ-कॉमर्स सेवेची चाचणी सुरू करत रिलायन्सने आता Amazon आणि Walmart च्या फ्लिपकार्ट या आघाडीच्या ई-कॉमर्स कंपन्यांना टक्कर देण्याची जोरदार तयारी केली आहे.

‘असा’ घेता येईल लाभ
Reliance Retail च्या JioMart या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मची सेवा सध्या मुंबईच्या काही परिसरात सुरू करण्यात आली आहे. नवी मुंबई, ठाणे, कल्याण या परिसरातील काही निवडक ठिकाणी ही सेवा सुरू करण्यात आली आहे. जिओमार्टच्या सेवेसाठी इच्छुक ग्राहकांना JioMart चा WhatsApp क्रमांक 8850008000 आपल्या फोनच्या कॉन्टॅक्टमध्ये सेव्ह करावा लागेल. या नंबरवर ‘Hi’ असा मेसेज पाठवल्यानंतर ग्राहकांना ऑर्डरसाठी जिओमार्टद्वारे एक लिंक मिळते. ही लिंक ३० मिनिटांसाठी वैध असते. त्यापेक्षा अधिक वेळ लागल्यास पुन्हा मेसेज पाठवावा लागतो. एकदा ऑर्डर केल्यानंतर कंपनी तुमची ऑर्डर एका किराणा दुकानासोबत शेअर करेल. यानंतर ग्राहकांना ऑर्डरबाबत नोटिफिकेशन आणि दुकानाबाबतची सर्व माहिती मिळते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”