हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली याना नुकताच हृदयविकाराचा झटका आला होता. सौरव गांगुली सध्या कोलकातामधील वुडलॅन्ड्स रुग्णालयात उपचार घेत आहे. शनिवारी हृदयविकाराचा झटका आल्यानंतर सौरव गांगुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गांगुलीची पत्नी डोना गांगुलीला फोन करुन त्याच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि त्यांना सर्वतोपरी मदतीचं आश्वासनही दिलं आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सौरवच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थनाही केली आहे. तसंच सौरवच्या उपचारांसाठी लागणाऱ्या सर्व मदतीची तयारीही शाह यांनी दर्शवली आहे. शाह यांनी सौरवची पत्नी डोना गांगुलीला फोन करुन सौरवच्या प्रकृतीची माहितीही घेतली आहे.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जींकडून प्रार्थना
दरम्यान, बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गांगुलीच्या स्वास्थ्यासाठी पार्थना केली आहे. “गांगुलीला सौम्य झटका आला, हे ऐकून मला फार दुख झालं. गांगुली लवकरात लवकर बरा व्हावा, अशी मी प्रार्थना करते. आम्ही गांगुलीच्या कुटुंबासोबत आहोत,” असं ट्विट ममता बॅनर्जी यांनी केलं आहे
Sad to hear that @SGanguly99 suffered a mild cardiac arrest and has been admitted to hospital.
Wishing him a speedy and full recovery. My thoughts and prayers are with him and his family!
— Mamata Banerjee (@MamataOfficial) January 2, 2021
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’