हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – “अमित शहा हे प्रखर राष्ट्रवादी नेते आहेत त्यांची बरोबरी कुणी करूच शकतं नाही.तसेच अमित शहा यांच्या आयुष्यातील बऱ्याच घटना या कधीच पुस्तकात येऊ शकतं नाहीत कारण अमित शहा हे पद्यामागचे नेते आहेत त्यांना प्रसिध्दीचा अजिबात सोस नाही आणि म्हणूनच आपल्या आयुष्यातील बऱ्याच बाबी त्यांना सांगायच्या असतील पण ते सांगू शकणार नाहीत असे मत भाजपच्या केंद्रीय महिला व बालकल्याण विकास मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी आज पुण्यात बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित पुस्तकं प्रकाशन सोहळ्यात व्यक्त केले. “अमित शहा आणि भाजपची वाटचाल” अनिर्बान गांगुली आणि नित्यानंद द्विवेदी लिखित पुस्तकाचा मराठी अनुवाद जोत्सणा कोलटकर आणि प्रीती कांबेकर यांनी केला आहे त्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज पुण्यात पार पडला.त्याला प्रमुख पाहुण्या म्हणून स्मृती इराणी (Smriti Irani) उपस्थित होत्या.
इराणी पुढे म्हणाल्या की “अमित शहांना वयाच्या तेराव्या वर्षी बऱ्याच शास्त्रांच ज्ञान होत.कधीकाळी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कन्या मनीबेन पटेल यांच्या प्रचाराचे पोस्टर लावणारे अमित शहा आज जगातल्या सर्वात मोठ्या पार्टीचे अध्यक्ष होतात हेच आपल्या पक्षाचे वेगळेपण आहे.अमित भाईंची प्रेरणा सावरकर आणि चाणक्य आहेत.ते नेहमी व्यक्ती निर्माण करायला महत्त्व देतात.शहा हे नेते नव्हे कार्यकर्ते आहेत.त्यामुळे कार्यकर्ता कसा असावा याची त्यांना जाणं आहे म्हणून भाजपच्या कार्यालयात कोणती पुस्तके असतील ते सुद्धा अमित शहा ठरवतात.
यावेळी पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी जोरदार भाषण करत कार्यक्रमात रंगत आणली.ते म्हणाले की “आपल्याला सगळं हवं असतं पण कष्ट करायला नको असतात तर मित्रांनो हे कसे चालेल त्यामुळे कष्ट करा कष्ट अन्यथा काहीच मिळणार नाही.तसेच आपण नॅशनल काय इंटरनॅशनल झालो आहोत म्हणून कार्यकर्त्यांनो अजिबात घाबरु नका.फक्त लढा असे बापट म्हणाले.भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की “स्मृतीजी (Smriti Irani) यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढली.पण काँगेस, राष्ट्रवादीवाल्यांचा राग वाढला.स्मृतिजींना विरोध करता काय.सुरवात तुम्ही केलीय शेवट आम्ही करू.अशा शब्दात त्यांनी काँग्रेस – राष्ट्रवादीला बजावले. यावेळी योगेश मुळीक,मुरलीधर मोहोळ,सिद्धार्थ शिरोळे, श्रीकांत भारतीय,श्वेता महाले,राजेश पांडे,प्रदीप रावत,धीरज घाटे,संदीप खर्डेकर,गणेश बीडकर आदी मान्यवर उपस्थित होते.
हे पण वाचा :
लग्नानंतर नवरा-नवरीने स्वत:ला घेतले पेटवून, उपस्थित पाहुण्यांनासुद्धा बसला धक्का!
पुणे रेल्वे स्टेशनवर आढळली संशयास्पद वस्तू?; पोलिसांनी तपासात दिला ‘हा’ प्राथमिक निष्कर्ष
जयकुमार गोरेंचे सहकारी महेश बोराटे व दत्तात्रय घुटुगडे यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी