शिवाजी महाराज जर नसते तर…; शहांनी यशवंतराव चव्हाणांच्या ‘त्या’ वाक्याची आठवण करून दिली

0
221
amit shah shivaji maharaj
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आज पाकिस्तानची बॉर्डर आपल्या घराजवळ राहिली असती या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या वाक्याची आठवण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी करून दिली. आणि शिवरायांना जन्मदिनी अभिवादन केलं. आज पुण्यात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदर यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या शिवसृष्टीचं उद्घाटन अमित शाह यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी अमित शाह बोलत होते.

शाह म्हणाले, यशवंतराव चव्हाण यांनी सांगितले होते की, देशाच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांचे मोठे योगदान आहे. शिवराय नसते तर शिवाजी महाराज जर नसते तर पाकिस्तानची बॉर्डर आपल्या घराजवळ राहिली असती, पाकिस्तानची सीमा शोधण्यासाठी आपल्याला फार दूर जावं लागलं नसतं. त्यात तथ्य आहे. शिवाजी महाराजांची महती सांगणारं हे विधान आहे. शिवाजी महाराजांचे जीवन हे एका राजाचे जीवन नसून एका विचारांचे जीवन आहे असेही अमित शाह म्हणाले.

यावेळी अमित शाह यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या कार्याचेही तोंडभरून कौतुक केलं. बाबासाहेब पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना देशाच्या कानाकोपऱ्यात पोचवण्याचे काम केलं. बाबासाहेब पुरंदरे यांनी हे काम केले नसते, तर शिवाजी महाराज यांची ओळख तितक्या मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत पोचली नसती त्यामुळे त्यांचे देशावर खूप मोठे उपकार आहेत असेही अमित शाह यांनी म्हंटल.