नितीश कुमारांसाठी भाजपचे दरवाजे बंद; बिहारच्या भूमीत जाऊन अमित शहांचा हल्लाबोल

amit shah nitish kumar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नितीशकुमारांसाठी भाजपचे दरवाजे कायमचे बंद झाले आहेत, तुम्हाला पुन्हा भाजपचा पाठिंबा मिळेल असे तुम्हाला वाटत असेल तर ते विसरून जा असं म्हणत भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. बिहारमधील हिसुआ येथे आयोजित सम्राट अशोक जयंती कार्यक्रमात बोलताना त्यांनी नितीशकुमार आणि लालूप्रसाद यादव या जोडगोळीवर चांगलंच तोंडसुख घेतलं.

अमित शाह म्हणाले, नितीश बाबू, सत्तेच्या लालसेने तुम्हाला लालूजींच्या मांडीवर बसण्यास भाग पाडले. तुम्हाला पुन्हा भाजपचा पाठिंबा मिळेल असे वाटत असेल तर ते विसरून जा कारण भाजपचे दरवाजे तुमच्यासाठी कायमचे बंद झाले आहेत असं शाह यांनी म्हंटल तसेच इथून पुढे कधीही नितीश कुमार यांच्याशी युती करणार नाही असे आश्वासन शाह यांनी बिहारच्या जनतेला दिले.

यावेळी त्यांनी लालूप्रसाद यादव यांच्यावरही निशाणा साधला. लालूजी, तुम्ही विचार करत असाल की नितीश कुमार पंतप्रधान होतील आणि तुमच्या मुलाला म्हणजेच तेजस्वी यादवला मुख्यमंत्री करतील तर ती आशा सोडून द्या. कारण नितीशही पंतप्रधान होणार नाहीत आणि तेजस्वी सुद्धा मुख्यमंत्री होणार नाही असं म्हणत शाह यांनी लालूप्रसाद यादव यांना इशारा दिला.