अमिताभ बच्चन यांचा अपघात; बरगडीला दुखापत, श्वास घेण्यास त्रास

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलीवूडचे महानायक बिग बी अमिताभ बच्चन यांचा अपघात झाला आहे. शूटिंगदरम्यान अमिताभ बच्चन जखमी झाले असून त्यांच्या बरगड्यांना दुखापत झाली आहे. बच्चन यांनी स्वतः याबाबत माहिती दिली आहे. आता आपली तब्ब्येत ठीक आहे, त्यामुळे काळजी करू नका असे आवाहन त्यांनी आपल्या चाहत्यांना केलं.

हैदराबादमध्ये प्रोजेक्ट K साठी शूट करताना, अॅक्शन शॉट दरम्यान, जखमी झालो, बरगडीला दुखापत झाली असून उजव्या बरगडीच्या पिंजऱ्यात स्नायू फाटले. यांनतर शूटिंग रद्द केले आहे. हैदराबादच्या AIG हॉस्पिटलमध्ये CT स्कॅनद्वारे डॉक्टरांचा सल्ला घेतला आणि स्कॅन करून घरी परतलो आहे असं अमिताभ बच्चन यांनी पोस्टच्या माध्यमातून सांगितलं.

ते पुढे म्हणाले, आता मी घरी आलो आहे. काळजी करण्याचं काहीही कारण नाही. पण हालचाल करण्यास आणि श्वास घेतला प्रचंड त्रास झाला. औषधें सुरु आहेत. आता पूर्णपणे बर होईपर्यँत सर्व कामे थांबवली आहेत. मी जलसा येथे विश्रांती घेत आहे. परंतुमला आज संध्याकाळी जलसा गेटवर हितचिंतकांना भेटता येणार नाही. त्यामुळे कोणीही भेटायला येऊ नका असं आवाहन अमिताभ बच्चन यांनी केलं.