अमिताभ बच्चन यांनी मागितली सचिन तेंडुलकरची माफी; नेमकं काय आहे प्रकरण?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची माफी मागितली आहे. सचिन बाबत चुकीच ट्विट केल्यानंतर अमिताभ चर्चेत आलेत. दरम्यान या चुकीच्या ट्विटनंतर अमिताभ यांनी तातडीने माफी मागितली आहे.

अमिताभ बच्चन यांनी एक व्हिडीओ ट्विट केला होता. या व्हिडीयोमध्ये, भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर जगभरातील माजी आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या ‘लिजेंड्स लीग क्रिकेट’मध्ये सहभागी झाला होता, असं म्हटलं होतं. यानंतर लगेच एसआरटी स्पोर्ट्स मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडने शनिवारी स्पष्ट केलं की, सचिन तेंडुलकर येणाऱ्या ‘लिजेंड्स लीग क्रिकेट’चा (LLC)  भाग नाही. तेंडुलकर ‘लिजेंड्स लीग क्रिकेट’मध्ये सहभागी झाल्याची बातमी खरी नाही असे त्यांनी स्पष्ट केले.

त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी लगेच नवा व्हिडीओ शेअर केला. ‘लीजेंड्स लीग क्रिकेट 20′ चा फायनल प्रोमो. कुणालाही त्रास झाला असेल तर माफी मागतो. ही अनावधानाने झालेली चूक होती,’ असे ट्विट त्यांनी केले.

 

दरम्यान, लीजेंड्स लीग क्रिकेटमध्ये भारत, पाकिस्तान, श्रीलंका, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलियासह अन्य देशांचे निवृत्त झालेले क्रिकेटपटू खेळणार आहेत. भारतीय टीमचं प्रतिनिधित्व युवराज सिंग, वीरेंद्र सेहवाग, हरभजन सिंग, इरफान पठाण आणि युसूफ पठाण यांच्यासह अन्य खेळाडू करतील. भारताच्या टीमचं नाव ‘द इंडिया महाराजा’ असं असणार आहे.

You might also like