पणजी | अभिनेता अमिताभ बच्चन यांनी बुधवारी ५० व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (IFFI) उद्घाटन केले. यावेळी बच्चन यांनी ‘देवियों और सज्जनों’ असं म्हणत आपल्या भाषणाची सुरवात करत उपस्थितांची मने जिंकली. चाहत्यांनी त्यांच्या दीर्घ आणि चढ-उतार असलेल्या आयुष्यात आणि करिअरमध्ये सोबत दिल्याबद्दल बच्चन यांनी चाहत्यांचे आभार मानले.
Bollywood's Shahenshah and the Chief Guest of #IFFI50, Shri. @SrBachchan felicitated by Thalaivar Shri. @rajinikanth at #IFFI2019 @satija_amit @MIB_India @PIB_India @esg_goa pic.twitter.com/krI5j5z7D5
— International Film Festival of India (@IFFIGoa) November 20, 2019
इफ्फी चे यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्याने प्रेक्षकांमध्ये मोठा उत्साह पहायला मिळाला. अभिनेते बच्चन यांचे चाहत्यांनी स्टेजवर आनंदाने स्वागत केले. सुपरस्टार रजनीकांत, माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोदकुमार सावंत हे अमिताभ यांच्या सन्मानार्थ व्यासपीठावर उपस्थित होते.
आप मेरी जनता – it's to you whom I am most indebted
It's incredible that we have @rajinikanth with us today, inspiring us every day, every time
Very grateful to #IFFI2019 for choosing me and my films for a retrospective
– Amitabh Bachchan @SrBachchan, #IFFI50 opening ceremony pic.twitter.com/6ehwWVA5OT
— PIB India (@PIB_India) November 20, 2019
बॉलिवूडमध्ये ५० वर्षे पूर्ण करणारे अमिताभ भावनिक पद्धतीने म्हणाले, माझ्या लोकांनो, मी तुमचे आभार मानू इच्छितो. जीवनातल्या प्रत्येक चढ-उतारात तूम्ही मला साथ दिलीत. मी नेहमी म्हणतो की लोकांचा मी ऋणी आहे. मी तुमची परतफेड कधीच करु शकत नाही आणि मला तसे करायचेही नाही. मला तुमचे हे प्रेम माझ्याजवळ ठेवायचे आहे. तसेच चित्रपटाच्या प्रवासाला सहकार्य करणार्या त्यांच्या आई-वडीलांचे स्मरण बच्चन यांनी यावेळी केले.