गांधी हत्येचं समर्थन कधीच केलं नाही; अमोल कोल्हे यांचं स्पष्टीकरण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी व्हाय आय किल्ड गांधी या चित्रपटात  नथुराम गोडसेंची भूमिका साकारल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे. त्यावरुन राष्ट्रवादी कॉंग्रेसमधेच 2 गट पडले असून काहींनी अमोल कोल्हे यांना विरोध केला आहे तर काही नेत्यांनी समर्थन करत कोल्हे यांची पाठराखण केली आहे. दरम्यान, या संपूर्ण वादावर अमोल कोल्हे यांनी आपली भूमिका स्पष्ट करत गांधी हत्येचं समर्थन कधीच केलं नाही असे म्हंटल आहे.

अमोल कोल्हे म्हणाले, २०१७मध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण झाले होते, तेव्हा मी सक्रिय राजकारणात नव्हतो, किंवा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत नव्हतो. दुसरी गोष्ट म्हणजे एखाद्या चित्रपटात एखादी भूमिका करतो म्हणजे त्याच्या विचारधारेशी शंभर टक्के जोडले गेलेलो असतो असे नाही असे अमोल कोल्हे यांनी म्हंटल.

मी सार्वजनिक आयुष्यात नधुराम गोडसेंच्या उदात्तीकरणासंदर्भात किंवा गांधीहत्येच्या समर्थनार्थ कधीही भूमिका घेतली नाही. त्यामुळे केवळ एक कलाकार म्हणून भूमिका निभावताना त्याचा राजकीय विचारांशी संबंध जोडला जाऊ नये. या दोन भिन्न गोष्टी आहेत,’ असा खुलासा कोल्हे यांनी केला.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मात्र या संपूर्ण प्रकरणी नाराजी व्यक्त केली आहे. अमोल कोल्हे यांनी केलेली कृती जरी कलाकार म्हणून केली असली, तरी त्यामध्ये नथुराम गोडसेचे समर्थन आलेच आहे. कलाकाराचा वेष घेऊन तुम्ही गांधी हत्येचे समर्थन करू शकत नाही अस म्हणत आपण या गांधी विरोधी चित्रपटाला विरोध करणार आहे असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हंटल.

Leave a Comment