अमोल कोल्हे नथुराम गोडसेच्या भूमिकेत; आव्हाडांकडून विरोध तर टोपेंचं समर्थन… राष्ट्रवादीतच मतमतांतरे

0
52
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी व्हाय आय किल्ड गांधी या चित्रपटात  नथुराम गोडसेंची भूमिका साकारल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे. त्यावरुन राष्ट्रवादी कॉंग्रेसचेच नेते जितेंद्र आव्हाड यांनी नाराजी व्यक्त करत हे चुकीचे आहे असं स्पष्ट मत मांडले. तसेच आपण या चित्रपटाला विरोध करणार आहे असेही त्यांनी म्हंटल.

डॉ. अमोल कोल्हे यांच्या चित्रपटाचा ट्रेलर पाहून हे स्पष्ट होते की अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसे ची भूमिका केलेली आहे. त्यांनी केलेली कृती जरी कलाकार म्हणून केली असली, तरी त्यामध्ये नथुराम गोडसेचे समर्थन आलेच आहे. कलाकाराचा वेष घेऊन तुम्ही गांधी हत्येचे समर्थन करू शकत नाही अस ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केलं.

विनय आपटे ~शरद पोंक्षे ह्यांना ह्या भूमिके बद्दल महाराष्ट्रातील पुरोगामी जनतेनी प्रचंड विरोध केली त्यामुळे त्याच भूमिकेबरोबर राहून ह्या गांधी विरोधी चित्रपटाला विरोध करणार अशी स्पष्ट भूमिका जितेंद्र आव्हाड यांनी मांडली.

अमोल कोल्हे यांच्याकडे कलेच्या भूमिकेतून पहा – टोपे

दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसचेच नेते आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मात्र यावर सावध प्रतिक्रिया दिली आहे. अमोल कोल्हेंची खरी ओळख ही अभिनेता म्हणून आहे. ते लोकप्रिय आणि गुणी अभिनेते आहेत. अभिमान वाटावा असे कलाकार आहेत. त्यांची संभाजी मालिका सर्वजण पाहात असतात. अभिनेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले पाहिजे. गोडसेंचा रोल केला असला तरी अभिनेत्याच्या अँगलने त्याकडे पाहिलं पाहिजे. ते कलावंत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे कलेच्या भूमिकेतून पाहा, असं आवाहन टोपे यांनी केलं.

अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले-

२०१७मध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण झाले होते, तेव्हा मी सक्रिय राजकारणात नव्हतो, किंवा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत नव्हतो. दुसरी गोष्ट म्हणजे एखाद्या चित्रपटात एखादी भूमिका करतो म्हणजे त्याच्या विचारधारेशी शंभर टक्के जोडले गेलेलो असतो असे नाही असे अमोल कोल्हे यांनी म्हंटल. मी सार्वजनिक आयुष्यात नधुराम गोडसेंच्या उदात्तीकरणासंदर्भात किंवा गांधीहत्येच्या समर्थनार्थ कधीही भूमिका घेतली नाही. त्यामुळे केवळ एक कलाकार म्हणून भूमिका निभावताना त्याचा राजकीय विचारांशी संबंध जोडला जाऊ नये. या दोन भिन्न गोष्टी आहेत,’ असा खुलासा कोल्हे यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here