राजगुरू नगर(खेड) प्रतिनिधी | अभिनेते आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी शिवसेना सोडण्याचे खरे कारण आज राष्ट्रवादीच्या प्रचाराच्या सांगता सभेत केले आहे. मला शिवसेनेने उदयनराजेभोसले यांच्या विरोधात निवडणूक लढवणार का असे विचारण्यात आले तेव्हा मी म्हणालो कि शिवाजी महाराजांच्या गाडीशी मी बेईमानी करणार नाही. त्यानंतर काही दिवसांनी मला शिवसेनेचे कार्य मनाला पटत नसल्याने मी शिवसेना सोडली असे अमोल कोल्हे यांनी म्हणाले आहे.
सुप्रिया सुळेंच्या पराभवाच्या चर्चेला बारामती मतदारसंघात ऊत
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना भेटून अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर त्यांना विलास लांडे यांना मागे सारून लोकसभेची उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर त्यांनी शिरूर मध्ये आघाडी घेत तीनवेळा खासदार राहिलेल्या शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या समोर मोठे आव्हान उभे केले.
पार्थ प्रचार : नवनीत राणांचा रोड शो ; कॉंग्रेस राष्ट्रवादी कार्यकर्त्यामध्ये हाणामारी
स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतून घराघरात जावून पोचलेल्या अमोल कोल्हे यांना जनता निवडून देते का हे देखील पाहणे अवचीत्याचे राहणार आहे. तर राष्ट्रवादीने आढळराव पाटील यांना रोखण्यासाठी जंग जंग पछाडले आहे. तर शिरूर लोकसभेसाठी सोमवारी २९ एप्रिल रोजी मतदान होत आहे. कदाचित मतदानानंतर चित्र स्पष्ट होण्यास मदत होणार
राधाकृष्ण विखेंचा गौप्यस्फोट ; राहुल गांधी यांनीच दिला पक्ष बदलण्याचा सल्ला