राष्ट्रवादी नेत्याचे भन्नाट विधान ; अमोल कोल्हेंची बॉडी बघून त्यांना मिठीच मारू वाटते

1
41
Untitled design
Untitled design
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मंचर प्रतिनिधी | शिरूर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलताना राष्ट्रवादीचे नेते मंगलदास बांदल यांनी एक भन्नाट विधान करताच उपस्थितांमध्ये एकच हाशा पिकला. पवार साहेबांनी  असा तगडा उमेदवार दिला आहे कि त्याची बॉडी बघूनच त्याला मिठी मारू वाटते असे मंगलदास बांदल म्हणाले आहेत.

सुप्रिया सुळेंच्या पराभवाच्या चर्चेला बारामती मतदारसंघात ऊत

अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणाऱ्या आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील मंचर या ठिकाणी जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मंगलदास बांदल बोलत होते. तसेच बांदल यांनी हे विधान केले तेव्हा शरद पवार देखील व्यासपीठावर उपस्थितीत होते. त्याच प्रमाणे यावेळी प्रवीण गायकवाड, आ. दिलीप वळसे पाटील, माजी आमदार दिलीप मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते.

माढा : मोहिते पाटलांचा अंदाज खरा होण्याची शक्यता ; माळशिरसमध्ये झाले २ लाख ३९ हजार ५७३ एवढे मतदान

राष्ट्रवादीच्या उमेदवाराचे सौंदर्यबघा आणि शिवसेनेच्या उमेदवाराचे तोंड बघा. कोण देखणा आहे. कोण तगडा आहे ते बघा आणि मतदान करा असे देखील मंगलदास बांदल म्हणले आहेत. शिवसेनेच्या लोकांनी  पैसे दिले तरी घ्या पण मत घड्याळाला द्या. आता धनुष्य बघू नका आपला मनुष्य बघा असे बांदल म्हणाले आहेत.

पार्थला उमेदवारी देण्याचे सिक्रेट पवारांनी केले ओपन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here