जळगाव : हॅलो महाराष्ट्र – सध्या शिंदे गटामध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शुक्रवारी ठाकरे गटाच्या बारा माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला. ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. यादरम्यान राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. शिंदे गटातील तीन आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कांत आहेत. या आमदारांनी अधिवेशनापूर्वीच राष्ट्रवादीत येण्याची इच्छा असल्याचे म्हंटले आहे.
नेमके काय म्हणाले अमोल मिटकरी?
शिंदे गटातील तीन आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कांत आहेत. अधिवेशनापूर्वीच त्यांनी राष्ट्रवादीत येण्याची इच्छा असल्याचा गौप्यस्फोट अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, एकनाथ खडसे स्टेजवर बसले आहेत, जबाबदारीने सांगतो हे सरकार कोसळणार आहे. पुन्हा आपली सत्ता येणार आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार रखडल्याचे त्यांनी म्हंटले आहे.
मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला
गेल्या अनेक दिवसांपासून मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा सुरू आहे. मात्र अजूनही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. आता अधिवेशनानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची चर्चा रंगली आहे. तर दुसरीकडे मंत्रिमंडळाचा विस्तार रखडल्यानं विरोधकांकडून सरकारवर टीका केली जात आहे. यावेळी त्यांनी शिंदे, फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. अमोल मिटकरी (Amol Mitkari) पुढे म्हणाले देवेंद्र फडणवीस यांना चांगलं माहिती आहे, जोपर्यंत मंत्रिमंडळचा विस्तार होत नाही तोपर्यंतच आपलं सरकार आहे. एकदा का मंत्रिमंडळ विस्तार झाला की हे सरकार शंभर टक्के कोसळणार. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार होत नसल्याचे अमोल मिटकरी म्हणाले आहेत.
हे पण वाचा :
Jio Fiber च्या 699 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 14 OTT Apps चे फायदे
Smartphones मधील मागचा कॅमेरा नेहमी डाव्या बाजूलाच का असतो???
PNB च्या खातेधारकांनी लवकरात लवकर पूर्ण करा ‘हे’ काम
RBL Bank च्या ‘या’ क्रेडिट कार्डवरील प्रत्येक ट्रान्सझॅक्शनवर मिळवा 1% कॅशबॅक
मुलांसाठी बचत खाते उघडण्याचे फायदे जाणून घ्या