… अन्यथा सत्तारांची जीभ हासडल्याशिवाय आम्ही राहणार नाही; राष्ट्रवादी आक्रमक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिंदे गटाचे आमदार आणि राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत बोलताना शिवीगाळ केली. सत्तार यांच्या वादग्रस्त विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. अब्दुल सत्तार यांनी आपले शब्द २४ तासांत मागे घ्यावे अन्यथा त्यांची जीभ हासडल्याशिवाय आम्ही राहणार नाही असा थेट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी दिला आहे.

अमोल मिटकरी म्हणाले, असा मंत्री महाराष्ट्राचा कृषिमंत्री असेल तर हे दुर्दैवी आहे. सत्तार याने सुप्रिया सुळे यांच्याबाबत जे वक्तव्य केलं त्यामुळे हे किती विकृत माणूस आहे हे समजत. आई बहिणींचा सन्मान करणं हीच छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राची संस्कृती आहे. त्यामुळे अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्याबद्दल जे काही वक्तव्य केलं ते त्यांनी २४ तासात मागे घ्यावं अन्यथा आम्ही संस्कृती आणि पक्ष बाजूला ठेऊन त्यांची जीभ हासडल्याशीवाय राहणार नाही असा इशारा अमोल मिटकरी यांनी दिला.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांची सत्तार यांच्या विधानाचा समाचार घेतला आहे. कृषिमंत्र्यांचं वक्तव्य संतापजनक असून महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याच्या मंत्र्याला शोभणारं नाही.सत्तार साहेब सत्तेची हवा एवढी डोक्यात जाऊ देऊ नका. आमच्यावर संस्कार आहेत याचा अर्थ शिव्या मुकाट्याने सहन करू असं होणार नाही.महिला सन्मानाच्या गप्पा झोडणाऱ्या भाजपाला हे कसं चालतं? असा सवाल रोहित पवारांनी केला आहे.