हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी दगडफेक आणि चप्पल फेक करत आंदोलन केलं. या संपूर्ण घटनेमुळे राज्यातील वातावरण चिघळले आहे. दरम्यान, या प्रकरणा मागील मोहरा सदावर्ते असले तरीही सूत्रधार नागपुरात बसलेले असू शकतात हे शोधावं लागेल, असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे.
काही मूठभर लोकांना हाताशी घेऊन चप्पल आणि दगडं घेऊन जाणारी जी प्रवृत्ती आहे. त्यामागील मास्टरमाईंड दुसरा तिसरा कोणी नसून हा गुणरत्न सदावर्ते नावाचा वकील आहे. त्यांनी कालचं भाषण देखील चिथावणी खोरं दिलं, असं अमोल मिटकरी म्हणाले. परंतु या प्रकरणा मागील मोहरा सदावर्ते असले तरीही सूत्रधार नागपुरात बसलेले असू शकतात हे शोधावं लागेल, असं म्हणत मिटकरींनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेता निशाणा साधला आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील या संपूर्ण प्रकरणावर नाराजी व्यक्त करत शरद पवार यांच्या घरावर झालेली हल्ल्याची घटना निंदनीय असून या प्रकारास जबाबदार असणाऱ्यांवर तसेच हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.