पोट फुटेस्तुवर खाल्ल सदाभाऊ, आता बिलपण द्या; मिटकरींचा टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत सोलापूर दौऱ्यावर असताना एका हॉटेल वाल्याने त्यांचा ताफा अडवून त्यांना 2014 सालची उधारी मागितली. भर कार्यकर्त्यांपुढे हॉटेल चालकाने सदाभाऊंशी हुज्जत घातल्याने सदाभाऊ यांनी संताप व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेस वर आरोप केले. यानंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी त्यांच्यावर पलटवार केला आहे.

पोट फुटेस्तुवर खाल्ल सदाभाऊ, आता बिलपण द्या. तुमच्यामुळे त्या हॉटेल मालकाच्या जिवाला धोका निर्माण होतोय अशी सगळीकडे चर्चा आहे. शेतकऱ्यांसाठी पोट फुटेस्तव आंदोलन करा . आणि पवार साहेबांची उंची गाठायला आणखी सात जन्म वाट बघा.असे ट्विट अमोल मिटकरी यांनी केलं.

https://twitter.com/amolmitkari22/status/1537701883191640064?t=bBgYIEHquRPuRQKCUx_8dA&s=19

माझ्या जीवाला राष्ट्रवादी कडून धोका- सदाभाऊ

दरम्यान, या घटनेनंतर सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस वर आरोप केला आहे. माझ्या जीवाला पवार कुटुंब आणि राष्ट्रवादी काँग्रेस कडून धोका आहे. ही माणसे कोणत्याही थराला जाऊ शकतात. पण माझं त्यांना सांगणे आहे की, माझा प्राण गेला तरी चालेल. पण तुमची ही व्यवस्था, मस्तवाल पणाने उभा राहिलेला चिरेबंदी वाडा पाडल्या शिवाय सदाभाऊ शांत बसणार नाही असा इशारा त्यांनी दिला.

Leave a Comment