अमरावती जिल्ह्यात दारुबंदीसाठी महिलांचा पोलीस ठाण्याला घेराव; पोलीस आणि दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अमरावती प्रतिनिधी । आशिष गवई
अमरावती जिल्ह्यातील मंगरूळ चव्हाळा येथे महिलांनी दारूबंदीसाठी मंगळवारी पोलीस स्टेशनला घेराव घालून गावामध्ये दारूबंदी करा अशी मागणी करत महिला आक्रमक झाल्या होत्या. तसेच पोलीस दारू विक्रेत्यांकडून हप्ता घेत असल्याचा आरोपही महिलांनी पोलिसांवर केला आहे. त्यामुळे पोलिसांचे आणि दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

दरम्यान वारंवार विनवणी करून देखील गावात दारुबंदी होत नसल्याने महिलांनी काल रूद्रवतार धारण करून पोलीस स्टेशनला घेराव घातला होता. जो पर्यंत दारुबंदी होणार नाही. तो पर्यंत महिला स्वस्त बसणार नसल्याचा पवित्रा महिलांनी घेतला. त्यामुळे महिलांना शांत करण्यासाठी पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागली. पोलीस अवैध दारूविक्रेत्यांकडून हप्ता घेतात म्हणून दारू बंद होत नसल्याचा आरोप देखील महिलांनी केलाय आहे. महीलांच्या अचानक घेतलेल्या या पवीत्र्यामूळे पोलीसांची तारांबळ ऊडाली होती.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.