‘कशी नशिबाने थट्टा आज मांडली’ गाणं ऐकताच समोर येतो उद्धवजींचा चेहरा; अमृता फडणवीसांचा टोला

Amruta Fadnavis Uddhav Thackeray
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस सर्वपरिचित आहेत. सध्या त्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरील टोलेबाजीमुळे चर्चेत आल्या आहेत. ‘झी मराठी’वर नुकत्याच सुरू झालेल्या ‘बस बाई बस’ या कार्यक्रमात अमृता फडणवीस यांनी सहभाग घेतला. यावेळी ‘कशी नशिबाने थट्टा आज मांडली’ हे गाणं ऐकल्यावर कोणाचा चेहरा समोर येतो? असा प्रश्न सुत्रसंचालक सुबोध भावे अमृता यांना विचारताच “उद्धवजी ठाकरे यांचाच चेहरा आठवला,” असे म्हणत ठाकरे यांना टोला लगावला आहे.

‘बस बाई बस’ या कार्यक्रमातील अमृता यांचे काही प्रोमो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. हे प्रोमो पाहिल्यानंतर या भागामध्ये त्या राजकीय परिस्थिती तसेच आपल्या खासगी आयुष्याबाबत भाष्य करताना दिसणार आहेत. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे करत आहे.

https://www.instagram.com/reel/Cg3vDeFjOXt/?igshid=YmMyMTA2M2Y=

या कार्यक्रमाच्या पहिल्याच भागामध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी हजेरी लावली होती. आता त्यांच्यानंतर उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी कार्यक्रमात उपस्थिती लावली आहे. या कार्यक्रमात अमृता फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचे व्हिडीओ पाहून अनेकांकडून त्यांना ट्रोल देखील करण्यात आलेले आहे.