मुंबई । राजधानी दिल्ली पाठोपाठ मागील आठवड्यात गुजरामध्येही भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्यानंतर आता मुंबईला भूकंपाचे हादरे बसले आहेत. मुंबईजवळच्या परिसरात उत्तरेला भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता २.५ रिश्टर स्केल इतकी होती. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केद्रानं ही माहिती दिली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनं राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या हवाल्यानं ही माहिती दिली आहे.
राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्रानं दिलेल्या माहितीनुसार मुंबईपासून १०३ किलोमीटर उत्तर दिशेला भूकंपाचा केंद्रबिंदू होता. या भूकंपाची तीव्रता २.५ रिश्टर स्केल इतकी होती. सकाळी ११ वाजून ५१ मिनिटांच्या सुमारास हे धक्के जाणवले. दरम्यान, दिल्लीत लागोपाठ भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. दिल्लीत भूकंपाची मालिका सुरू असून, गेल्या आठवड्यात गुजरामध्येही भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्यांची तीव्रता कमी असली, तरी लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
An earthquake of 2.5 magnitude was recorded 103 km north of Mumbai, Maharashtra at around 11:51 am: National Center for Seismology
— ANI (@ANI) June 17, 2020
यापूर्वी राज्यात मार्च महिन्यामध्ये डहाणू आणि तलासरी परिसरात भूकंपाचे सातत्याने आठ हादरे जाणवले होते. पहिला हादरा २.० रिश्टरचा, त्यानंतर लगेच १८ मिनिटांनी वाजता २.३ रिश्टर स्केलचा धक्का जाणवला. तिसरा ८ वाजून ४५ मिनिटांनी २.४ रिश्टर स्केलचा, तर ८ वाजून ४७ मिनिटांनी २ रिश्टर स्केलचा धक्का जाणवला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी १० मार्च रोजी पहाटे चार धक्के बसले होते. मध्यरात्री १ च्या सुमारास २.८ रिश्टर स्केलचा आणि त्यानंतर पहाटे २.७ रिश्टर स्केलचा त्यानंतर पावणेदहा वाजेपर्यंत भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले होते.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”