हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर एक खासदार शरद पवार गट आणि दुसरा उपमुख्यमंत्री अजित पवार गट असे दोन गट पडले. या दोन्ही गटात सातारा जिल्ह्यातील काही निष्ठावंत आमदारही सहभागी झाले आहेत. या आमदारांमध्ये सर्वात जास्त चर्चा हि आमदार शशिकांत शिंदे यांची होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांचा वाढदिवस असल्याने त्यांच्या वाढदिवसापूर्वी लावण्यात आलेला एक बॅनर चर्चेचा विषय ठरत आहे.बी त्यांच्या बॅनरवर निष्ठावंत आमदार असे लिहिण्यात आल्यामुळे याची चर्चा चर्चा हि जिल्ह्यात होत आहे.
माथाडी कामगारांचे कैवारी म्हणून परिचित असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावान नेते शशिकांत शिंदे यांनी 1999 मध्ये प्रथम जावळीतून राष्ट्रवादी आमदारकीची निवडणूक लढवली. आणि आमदार झाले. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना त्यांनी 13 वर्षात जलसंपदा मंत्री पदापर्यंत मजल मारली. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदही स्विकारले. कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे त्यांनी सलग 2009 व 2014 प्रतिनिधित्व केले आहे.
विधानपरिषद सदस्य, आ. शशिकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आज सातारा तसेच कोरेगावातील अनेक मुख्य ठिकाणी वाढदिवसानिमित्त शुभेच्छाचे बॅनर लावण्यात आलेले आहेत. यामध्ये कोरेगाव जवळील ल्हासुर्णे फाटा या ठिकाणी लागलेल्या या बॅनरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या बॅनरवर आमदार शशिकांत शिंदे यांचा निष्ठावंत असा उल्लेख करण्यात आला आहे. राज्यामध्ये झालेल्या सत्तांतरानंतर आ. शशिकांत शिंदे यांनी खा. शरद पवार यांच्यासोबत एकनिष्ठ राहण्याची जी भूमिका घेतली होती. त्याच्या या भूमिकेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
शशिकांत शिंदेंचे ‘हे’ विधान शरद पवार साहेब कधीच विसरणार नाही….
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर खासदार शरद पवार यांना सोडून जाणाऱ्या आमदारांमध्ये नंतर कोरेगावच्या आमदार शशिकांत शिंदे यांचे नाव घेतले जाऊ लागले होते. मात्र, या चर्चेला खुद्द आमदार शशिकांत शिंदे यांनी एक वाक्यात उत्तर देत पूर्णविराम दिला. “शरद पवारांच्या निष्ठेपायी अपात्र झालो, तरी पर्वा नाही. त्यांच्यामुळे राजकारणात आलो. त्यांच्यामुळे पद मिळालं. त्यांच्यासाठी कुठलाही त्याग करण्याची तयारी आहे” असं शशिकांत शिंदे यांनी म्हंटले होते. त्यांचे हे विधान खा. पवार कधीच विसरणार नाहीत हे नक्की!
आजच्या बैठकीत आ. शशिकांत शिंदेंबाबत होणार मोठा निर्णय?
सातारा व माढा मतदारसंघांसह १४ लोकसभा मतदारसंघांतील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार शरद पवार गटाची महत्त्वपूर्ण बैठक आज मुंबईत राष्ट्रवादी भवनात होणार आहे. यामध्ये सातारा व माढा मतदारसंघांची बैठक सायंकाळी चार व पाच वाजता होणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या या बैठकीत १४ लोकसभा मतदारसंघांचा आढावा खा. पवार घेणार आहेत. या बैठकीत सातारा व माढा मतदार संघांच्या चर्चेसाठी जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघांतील प्रमुख पदाधिकारी, आमदार, खासदार, तसेच इच्छुक नेतेमंडळी बैठकीस उपस्थित राहणार आहेत. सातारा लोकसभेसाठी सध्यातरी खासदार पवार यांच्या गटाकडून विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांच्याबरोबरच त्यांचे सुपुत्र सारंग पाटील यांचे नाव पुढे आहे, तसेच आमदार शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील, सत्यजितसिंह पाटणकर, सुनील माने यांच्या नावावर ही चर्चा होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा जनता दरबार घेण्याची सुरु केली परंपरा…
आमदार शशिकांत शिंदे पदवीधर असून माथाडी कामगारांचे नेते म्हणून परिचित आहेत. 1999 मध्ये ते प्रथम जावळीतून राष्ट्रवादीतुन आमदार झाले. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना त्यांनी 13 वर्षात जलसंपदा मंत्री पदापर्यंत मजल मारली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ते जिल्हाध्यक्ष होते. कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे त्यांनी सलग 2009 व 2014 प्रतिनिधित्व केले आहे. ते राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विधानसभेतील पक्षप्रतोद आहेत. राज्य माथाडी ट्रान्स्पोर्ट आणि जनरल कामगार युनियन चे कार्याध्यक्ष तसेच सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक असलेल्या आ. शशिकांत शिंदे यांनी सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा जनता दरबार घेण्याची परंपरा सुरू केली.