इंस्टाग्रामवर अश्लील भाषेमध्ये व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या ‘थेरगाव क्‍विन’वर गुन्हा दाखल

पिंपरी : हॅलो महाराष्ट्र – सोशल मीडियावर अश्‍लिल भाषेचे आणि धमकी देणारे व्हिडिओ पोस्ट करणे तरुणीला महागात पडले आहे. यामुळे इन्स्टाग्रामवर ‘थेरगाव क्‍विन’ नावाने अकाऊंट चालविणाऱ्या दोन मुलींसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास हे अश्लील भाषेचे व्हिडिओ पोलीस उपनिरीक्षक महिलेच्या मोबाईलवर आले.

त्यानंतर त्यांनी कारवाई करत कुणाल कांबळे या तरुणाला आणि थेरगाव आणि चिंचवड परिसरात राहणाऱ्या दोन तरुणी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक संगीता गोडे यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. थेरगाव या ठिकाणी राहणारी मुलगी इन्टाग्रामवर ‘थेरगाव क्‍विन’ या नावाने अकाऊंट चालविते.

तिने आणि तिच्या दोन साथीदारांनी मिळून अश्‍लिल भाषा वापरून धमकीचे व्हिडिओ तयार केले. ते व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील अकाऊंटवर अपलोड केले. यानंतर हे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. यानंतर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.