आनंद महिंद्रा यांनी चार्जर प्लगमध्ये बसवला आणि त्यावर शूज अडकवला आहे. त्यानंतर चार्जरला अडकलेल्या या शूजमध्ये त्यांनी फोन चार्ज करायला ठेवला. यावेळी त्यांनी whatsappwonderbox मध्ये आलेला एक फोटो शेअर करत हा प्रयोग केल्यानंतर त्यांचा अनुभव कसा होता हे सांगितले. त्यावर “काही दिवसांपूर्वी मी गोव्यात गेलो होतो. तेव्हा मी फोन चार्ज करायची ही नवीन पद्धत ट्राय करुन पाहिली आणि माझं काम सोप्प झालं.( ही भन्नाट कल्पना मला #whatsappwonderbox वरुन सुचली होती. एकाने हा फोटो तेथे पोस्ट केला होता.) आतापर्यंत माझा फोन चार्ज करताना कधीच इतका कंफर्टेबल वाटला नव्हता”, असं ट्विट आनंद महिंद्रा यांनी केले आहे. सध्या त्यांचे हे ट्विट आणि भन्नाट कल्पना चांगलीच व्हायरल झाली आहे.
I was in the Goa this past weekend and in a place with a high-mounted wall socket…I actually tried this out (someone had posted this in my #whatsappwonderbox ) and it worked! My cellphone never looked more comfortable while being charged ???? pic.twitter.com/2oPBG26krD
— anand mahindra (@anandmahindra) December 2, 2019