Sunday, May 28, 2023

आपल्या नावाने व्हायरल झालेल्या खोट्या बातम्यांवर आनंद महिंद्रा यांचे हटके उत्तर

नवी दिल्ली । महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांची स्टाईलच वेगळी आहे. अनेक गंभीर गोष्टी अगदी हलक्याफुलक्या पद्धतीने सांगण्यासाठी ते ओळखले जातात. ते सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असल्याने त्यांना सोशल मीडियाची चांगलीच समज आहे. अलीकडेच त्यांच्याबद्दलच्या खोट्या बातम्या व्हायरल झाल्या तेव्हा त्यांनीही इंटरनेटच्या मीम्सच्या भाषेतच उत्तर दिले. एवढेच नाही तर कायदेशीर कारवाई करण्याचेही त्यांनी बोलून दाखवले आहे. आनंद महिंद्रा यांचा मीम देखील काही मिनिटांतच व्हायरल झाला, त्यामुळे काही लोकांनी कमेंट केली आणि त्याच्या उत्तरात जबरदस्त असे म्हटले. तसेच त्यांनी विचारले की,”हे खाते तुम्ही हाताळता का कि तुमची टीम?”

आनंद महिंद्रा यांच्या नावाने खोट्या गोष्टी
आनंद महिंद्रा यांच्या नावाने एक बनावट कोट शेअर करण्यात आला आहे. “एक सरासरी भारतीय पुरुष सोशल मीडियावर महिलांना फॉलो करत दिवस घालवतो, स्पोर्ट टीम्समध्ये त्याच्या आशा ठेवतो आणि त्याची स्वप्ने एका निष्काळजी नेत्याच्या हातात सोडतो,” असे या कोटमध्ये म्हटले गेले आहे, तर आनंद महिंद्रा यांनी असे काहीही म्हंटलेले नाही. या बनावट कोटवर प्रतिक्रिया देताना, त्यांनी आपल्या ट्विटर हँडलवर लिहिले कि, ‘माझ्या एका सहकाऱ्याने मला सांगितले: ‘असे दिसत आहे की, तुमची शिकार करण्यासाठी इंटरनेटवर स्काऊंड्रल्सचा सीझन आहे. माझ्या नावावर आणखी काही कोट पसरवले गेले. आता मी कायदेशीर कारवाई करणार आहे. दरम्यान, जेव्हा जेव्हा मला माझ्या नावावर आणखी खोट्या बातम्या दिसतील तेव्हा मी हे 2 मीम पोस्ट करेन.”

I never said that': Anand Mahindra debunks fake quote with memes, netizens love it | Trending News,The Indian Express

आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेल्या दोन मीम्सपैकी पहिल्यामध्ये त्यांचा फोटो आहे, ज्यामध्ये खाली कॅप्शन आहे ‘I Never Said That’ म्हणजेच मी असे म्हंटलेले नाही.’ दुसऱ्या मीममध्ये जॉली एलएलबी फिल्म मधील ‘कौन हैं ये लोग? कहां से आते हैं?’ हा डायलॉग कॅप्शनच्या स्वरूपात लिहिलेला आहे, जो चित्रपटात अर्शद वारसी बोलतो. अर्शद वारसीचा डायलॉग खूप चर्चेत राहिला आहे . ट्विटर किंवा फेसबुकवर जवळपास रोजच तो वेगवेगळ्या ट्रेंडमध्ये पाहायला मिळतो.

पोस्टवर आलेला रिप्लायही शेअर केला
आनंद महिंद्रा यांच्या पोस्टवर अनेक ट्विटर युजर्सनी मीम्ससह प्रतिक्रिया दिल्या आहेत. उत्तरातील एक मनोरंजक मीम आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर करताना लिहिले की, ‘मलाही हे आवडते.’ उत्तरातील मीम ‘रेडी’ चित्रपटातील एक सीन आहे ज्यामध्ये परेश रावल त्याच्या हातात एक पुस्तक आहे, जे परेश रावलने लिहिले आहे असे सलमान खान सांगतो. तेव्हा परेश रावल आश्चर्याने म्हणतो, ‘कमाल है, ये मैंने कब लिखी?’