IND vs PAK: कोण मारणार बाजी? आजपर्यंतचा रेकॉर्ड काय आहे?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – सध्या टी -20 वर्ल्डकप (T-20 World Cup) ऑस्ट्रेलियात खेळवला जात आहे. या वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज लढत होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना म्हणजे क्रिकेट रसिकांसाठी मोठी पर्वणी असते. या मॅचसाठी (T-20 World Cup) दोन्ही टीम्स जोरदार तयारी करत असून विजय मिळवण्याच्या इराद्याने टीम्स मैदानात उतरणार आहेत. गेल्या दोन महिन्यांत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील ही तिसरी मॅच असणार आहे.

पाकिस्तानचा ऑस्ट्रेलियात खराब रेकॉर्ड
यंदाचा टी-20 क्रिकेट वर्ल्ड कप 2022 (T-20 World Cup) हा ऑस्ट्रेलियात खेळवला जात असल्याने पाकिस्तानसाठी हि एक वाईट बातमी आहे. कारण, पाकिस्तान क्रिकेट टीमचा रेकॉर्ड ऑस्ट्रेलियात खूपच निराशाजनक आहे. टी-20 इंटरनॅशनलमध्ये पाकिस्तान क्रिकेट टीमला ऑस्ट्रेलियात अजूनपर्यंत एकही मॅच जिंकता आलेली नाही. पाकिस्तानच्या टीमने ऑस्ट्रेलियात आतापर्यंत 4 टी-20 इंटरनॅशनल मॅचेस खेळल्या आहेत. यापैकी तीन मॅचेसमध्ये पाकिस्तानी टीमला पराभवाचा सामना करावा लागला आहे तर एक मॅच ड्रॉ झाली आहे. या सगळ्या मॅचेस पाकिस्तानने ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळल्या आहेत.

टीम इंडियाचा जबरदस्त रेकॉर्ड
टीम इंडियाने ऑस्ट्रेलियात आतापर्यंत 12 टी-20 इंटरनॅशनल मॅचेस खेळल्या आहेत. त्यापैकी 7 मॅचेसमध्ये टीम इंडियाने विजय मिळवला आहे. तर चार मॅचेसमध्ये टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. टीम इंडियाने 2020 मध्ये आणि 2016 मध्ये ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरातील मैदानात टी-20 सीरिजमध्ये पराभूत केलं होतं. यामुळे भारत विरुद्ध पाकिस्तान या ऑस्ट्रेलियात होणाऱ्या मॅचमध्ये भारताचे (T-20 World Cup) पारडे जड आहे.

हे पण वाचा :
Senior Citizen Saving Scheme च्या व्याजदरात बदल
मुलं चोरणारा समजून नागरिकांकडून तरुणाला बेदम मारहाण, Video आला समोर
Repo Rate वाढल्यामुळे कर्ज महागणार तर FD वर मिळणार जास्त व्याज !!!
मला कुत्रा निशाणी दिली तरी मी निवडून येईल; सत्तारांचे विधान चर्चेत
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!! UPSC अंतर्गत 253 जागांसाठी भरती