हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष असलेल्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी तब्बल 25 जणांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. मात्र यामध्ये मुख्य लढत ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके आणि भाजपचे मुरजी पटेल यांच्यातच होणार हे नक्की… राज्यातील सत्तांतरानंतर प्रथमच एखादी विधानसभा पोटनिवडणूक होणार असून संपूर्ण राज्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागलं आहे.
या निवडणुकीसाठी एकूण 25 उमेदवारांनी नामनिर्देशन पत्रे निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत पाटील यांच्याकडे दाखल केल्याची माहिती मिळाली आहे. 25 मधील ८ उमेदवार हे अपक्ष आहेत तर उर्वरित उमेदवार हे छोटे पक्ष आणि संघटनेचे आहेत. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता सावधगिरी म्हणून ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके यांच्यासोबतच संदीप नाईक यांचाही अर्ज भरण्यात आला आहे.
खालील उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
यात मुरजी पटेल (भारतीय जनता पार्टी),
ऋतुजा लटके (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे),
संदीप नाईक (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे),
निखिलकुमार ठक्कर (अपक्ष),
चंद्रकांत मोटे (अपक्ष),
संदेश जाधव (पीपल्स पार्टी ऑफ इंडिया),
मनोज नायक (राईट टू रिकॉल),
अर्जुन मुरडकर (अपक्ष),
आकाश नायक (भारत जनाधार पार्टी),
मल्लिकार्जुन पुजारी (महाराष्ट्र विकास आघाडी)
चंदन चतुर्वेदी (उत्तर भारतीय विकास सेना),
राजेश त्रिपाठी (उत्तर भारतीय विकास सेना),
निकोलस अलोदा (अपक्ष),
साकिब नफुर इमाम मलिक (ऑल इंडिया महिला एम्पॉवरमेंट पार्टी),
श्रीमती फर्झाना सिराज सय्यद (ऑल इंडिया महिला एम्पॉवरमेंट पार्टी),
अंकुशराव पाटील (राष्ट्रीय मराठा पार्टी/अपक्ष),
बाळा विनायक (आपली अपनी पार्टी),
वाहिद खान (अपक्ष)
निर्मल नागबतूला (अपक्ष),
राकेश विश्वनाथ अरोरा (क्रांतिकारी जय हिंद सेना) आणि (हिंदुस्तान जनता पार्टी),
मिलिंद काशिनाथ कांबळे (अपक्ष)
श्रीमती नीना गणपत खेडेकर (अपक्ष)
दरम्यान, काल उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. ऋतुजा लटके आणि मुरजी पटेल या दोघांनीही काल जोरदार शक्तिप्रदर्शन केल्याचे पाहायला मिळाल. राज्यात महाविकास आघाडी एकत्र असल्याने ऋतुजा लटके याना काँग्रेस राष्ट्रवादीची भक्कम साथ मिळणार आहे. परंतु ठाकरे गटाचे नवं पक्षचिन्ह मशाल त्यांना घराघरात पोचवणं आवश्यक आहे. तर दुसरीकडे भाजपच्या मुरजी पटेल यांच्या सोबतीला शिंदे गट आणि रिपाई आहे. त्यामुळे अंधेरी पोटनिवडणूक अटीतटीची होणार हे मात्र नक्की…