‘या’ क्षुल्लक कारणावरून आरोपीने रागाच्या भरात सरपंचाचे डोकेच फोडले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वर्धा : हॅलो महाराष्ट्र – वर्धा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये गावात सुरु असलेल्या विकास कामांच्या जागेवरील वाळू उचलून नेत असताना हटकल्याने आरोपीने संतापाच्या भरात सरपंचाला शिवीगाळ केली. तसेच हा आरोपी एवढ्यावरच थांबला नाहीतर त्याने सरपंचाच्या डोक्यावर दगड फेकून सरपंचाचे डोके फोडले. या हल्ल्यात सरपंच जखमी झाला आहे. वर्धा जिल्ह्यातील वायफड या ठिकाणी हि घटना घडली आहे. विजय रामदास राऊत असे जखमी झालेल्या सरपंचाचे नाव आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?
वर्धा जिल्ह्यातील वायफड या गावात कंत्राटदाराने रस्त्याच्या बांधकामासाठी वाळू आणून ती रस्त्याच्या कडेला ठेवली होती. यावेळी आरोपी अरुण बावणे हा रस्त्याच्या कडेला ठेवलेली वाळू तो चोरून नेत होता. यादरम्यान सरपंच विजय राऊत यांना अरुण बावणे हा वाळू नेत असल्याचे दिसताच त्यांनी त्यास हटकले. याचा राग आल्याने आरोपी अरुण बावणे याने सरपंचाला शिवीगाळ केली.

हा आरोपी एवढ्यावरच थांबला नाहीतर त्याने सरपंचाला शिवीगाळ करून प्लास्टीक टोपल्याने, तसेच दगड फेकून हल्ला केला. यावेळी डोक्यावर दगड लागल्याने आणि मारहाण केल्याने सरपंच जखमी झाले. या घटनेनंतर जखमी सरपंच विजय राऊत यांनी पुलगाव पोलिसांत तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपी विरुद्ध कलम 324 अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. तसेच पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

Leave a Comment